इस्त्रायलने पुन्हा एकदा सीरियामध्ये हवाई हल्ले केले आहेत. सीरियन सरकारी मीडिया आणि एका युद्ध निरीक्षकाच्या मते इस्त्रायलने सीरियाच्या पश्चिम किनारपट्टीवरील टार्टस शहराजवळ असलेल्या सीरियन वायु संरक्षण बटालियनला लक्ष्य करून हवाई हल्ले केले आहेत. सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात टार्टसच्या बाहेरील भागांना लक्ष्य करण्यात आले, मात्र अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती मिळालेली नाही.
सीरियन सरकारी वृत्तसंस्था सानाच्या हवाल्याने सांगितले की, सीरियन नागरिक सुरक्षा दल आणि लष्करी तज्ज्ञांना नुकसानाचा अंदाज लावण्यासाठी आणि हल्ल्याच्या नेमक्या ठिकाणांची पुष्टी करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. एका स्थानिक टीव्ही चॅनेलने सांगितले की, हल्ला टार्टस येथील एका वायु संरक्षण बटालियनवर झाला होता. दरम्यान, सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्यूमन राइट्सने टार्टस बंदरावर मोठ्या स्फोटाची नोंद केली, जो अज्ञात विमानांच्या उपस्थितीशी संबंधित होता. असा विश्वास आहे की ही विमाने इस्त्रायलने पाठवली होती.
हेही वाचा..
पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं
छत्तीसगड: प्रार्थना सभांच्या नावाखाली आदिवासींचे धर्मांतर
बांगलादेशचे मोहम्मद युनुस म्हणतात, संघर्ष असूनही भारताशी संबंध मजबूत
अखेर धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा
हल्ल्याच्या आधी स्थानिक रहिवाशांना कथितरित्या चेतावणी संदेश पाठवण्यात आले होते. या संदेशांमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. इस्त्रायली सैन्य प्रवक्ते अविचाय एड्रै यांनी हल्ल्याची पुष्टी करताना सांगितले की, इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसने कर्दाहा येथील एका लष्करी ठिकाणावर हल्ला केला. जो टार्टसच्या जवळ असून माजी सीरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे जन्मस्थान आहे.
एड्रै म्हणाले, इस्त्रायल डिफेन्स फोर्सेसने सीरियातील एका लष्करी ठिकाणावर हल्ला केला. जो सीरियन सरकारकडून शस्त्रसाठ्यासाठी वापरण्यात येत होता. हा हल्ला या भागातील अलीकडील घटनांच्या प्रत्युत्तरात करण्यात आला आहे. बशर अल-असद सरकारच्या पतनानंतर सीरियामध्ये हा इस्त्रायलचा ताजा हल्ला आहे. त्यानंतर इस्त्रायलने सीरियामध्ये सुरक्षादलांना तैनात केले आणि हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली.