29.4 C
Mumbai
Monday, April 21, 2025
घरदेश दुनियापीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं

पीओकेमधील उपस्थितीनंतर भारताने हमासला दहशतवादी संघटना घोषित करावं

इस्रायलची भारताकडे मागणी

Google News Follow

Related

गाझा पट्टीतून हमास या दहशतवादी संघटनेचे उच्चाटन व्हावे यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या इस्रायलकडून आता या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी म्हणून भारताकडे आग्रह केला जात आहे. इस्रायलने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) ‘काश्मीर एकता दिन’ निमित्त हमास नेत्यांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच गाझा पट्टी हमासपासून मुक्त करण्याच्या त्यांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांदरम्यान इस्रायल आता या गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी भारतावर दबाव आणत आहे.

हमाला दहशतवादी गट म्हणून सूचीबद्ध करण्याची मागणी करण्यासाठीचे महत्त्वाचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात ‘काश्मीर एकता दिना’निमित्त पीओकेमध्ये अनेक हमास नेत्यांनी उपस्थिती दाखवली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (एलईटी) आणि जैश-ए-मोहम्मद (जेईएम) सारख्या संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेल्या दहशतवादी गटांच्या सदस्यांसह हमास नेते पीओकेमध्ये पोहचले होते.

हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी इस्रायलने भारतीय अधिकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केल्याची माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिली आहे. दहशतवाद विरोधी इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या भारताने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हमास केलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र निषेध असूनही हमासवर बंदी घातलेली नाही. दुसरीकडे अमेरिका आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांनी त्याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. २०२३ मध्ये, इस्रायलने मुंबईवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानस्थित एलईटीवर बंदी घातली होती. यानंतर इस्रायलचे भारतातील तत्कालीन राजदूत नाओर गिलोन यांनी आशा व्यक्त केली होती की, भारतही हमासवर बंदी घालेल.

हमास गटाच्या दहशतवादी कारवायांची माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. हमासवर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे की नाही हा प्रश्न भारतीय संसदेतही उपस्थित करण्यात आला आहे, परंतु परराष्ट्र मंत्रालयाने उत्तर देऊन फक्त असे म्हटले आहे की एखाद्या संघटनेला दहशतवादी म्हणून घोषित करणे UAPA अंतर्गत येते आणि संबंधित सरकारी विभागांद्वारे कायद्याच्या तरतुदींनुसार विचारात घेतले जाते.

भारताने दहशतवादाविरुद्ध इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन केले आहे, परंतु पॅलेस्टिनी लोकांशीही आपले संबंध कायम ठेवले आहेत. भारताने वारंवार द्विराष्ट्र सिद्धांताचे आणि इस्रायलसोबत शांततेने सहअस्तित्वात असलेल्या स्वतंत्र, सार्वभौम आणि सुरक्षित पॅलेस्टिनी राज्याच्या स्थापनेचे समर्थन केले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या सदस्यत्वालाही भारताचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत, भारताची संतुलित भूमिका या प्रकरणात कोणत्याही एकतर्फी निर्णयापासून सुरक्षित ठेवते. तथापि, पीओकेमध्ये हमास नेत्यांच्या उपस्थितीनंतर, भारत यावर आपली भूमिका काय घेणार याकडे लक्ष आहे.

हे ही वाचा..

छत्तीसगड: प्रार्थना सभांच्या नावाखाली आदिवासींचे धर्मांतर

बांगलादेशचे मोहम्मद युनुस म्हणतात, संघर्ष असूनही भारताशी संबंध मजबूत

बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला गोळ्या घालून ठार केले

अखेर धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा

पीओकेमध्ये भारत विरोधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये हमासचे नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे हमासच्या नेत्यांचे स्वागत जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) दहशतवाद्यांनी केले. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना व्हीआयपी वागणूकीसह अनेक सुविधा पुरवल्या गेल्या. एखाद्या रॅलीप्रमाणे दहशतवादी आपल्या गाड्या घेऊन जात होते. हमास नेत्यांवर फुलांचा वर्षाव केला गेला. यामुळे जगभरातून चिंता व्यक्त करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा