वर्सोव्यातील प्रभाग क्रमांक ५९ या प्रभागात सामाजिक कार्यकर्ते रामदास संधे यांचे पुत्र जयेश संधे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यांनी या प्रभागात जोरदार प्रचार केला असून या प्रभागातील लोकांच्या अपेक्षा भूमिपुत्र असलेला उमेदवारच पूर्ण करू शकतो, अशी लोकभावना आहे, त्यामुळे जयेश संधे यांना ही सुसंधी वाटते आहे.
सध्या या प्रभागात जयेश संधे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रॅली, घरोघरी प्रचार, सभा या माध्यमातून ते लोकाशी संपर्क वाढवत आहेत. या रॅली, प्रचारयात्रा यासाठी लोकांचा भरघोस प्रतिसादही मिळत असल्याचा दावा संधे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
हरमनप्रीत कौरकडे ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी
जगातील सर्वात मोठ्या ३३ फुटी शिवलिंगाची होणार प्राणप्रतिष्ठा
एलिसा हिलीचा संन्यास; भारताविरुद्ध अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका
बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या
जयेश संधे यांचे वडील आणि या भागात अनेक वर्षे सामाजिक कार्य करणारे, तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते रामदास संधे यांनी सांगितले की, जयेश संधे यांना आमच्या सहकारी सोसायट्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. ७५ वर्षांपासून काम करत असलेल्या या संघटना आहेत. ते म्हणाले की, वेसावे मच्छिमार विविध कार्यकारी, वेसावे मच्छिमार सहकारी संघ, सर्वोदय मच्छिमार संघ या अशा संघटनांनी जयेश संधे यांना पाठिंबा दिला आहे. वेसावे चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचाही पाठिंबा आहे. नाखवा संघ तसेच वेसावे सीफूड फेस्टिव्हल संघ परिसरातील सगळा मुस्लिम, कॅथलिक, तेलुगू, गुजराती समाजानेही जयेश संधे यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे.
जयेश संधे हे २०१३पासून काँग्रेससाठी काम करत आहेत. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते काँग्रेसमध्ये काम करू लागले. वेसावे मच्छिमार विविध कार्यकारी या सोसायटीचेही ते अध्यक्ष आहेत. तिथेही त्याला भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्याआधी, तिथे उपाध्यक्ष म्हणूनही ते निवडून आले आहेत. वेसावे कोळी विद्यामंदिर या १२ वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्थेतही जयेश यांनी निवडणूक जिंकली आहे.
रामदास संधे सांगतात की, या प्रभागाची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. गावठाण, झोपडपट्टी, हौसिंग सोसायट्या सीआरझेडचे प्रश्न आहेत. गावठाणचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तिथे असलेली राहती घरे तोडण्यात आली आहेत. ज्यांची ही घरे होती त्यांना आज भाड्याने राहावे लागत आहे. त्यामुळे गावकरी चिडलेत. या लोकांची तब्बल ५० घरे तोडली आहेत. म्हणून लोकांनी ठरविले की, भूमिपुत्राला निवडून लोकांचे हे प्रश्न सोडवायचे. इथे असलेल्या विविध पक्षांच्या बंडखोर उमेदवारांचा जयेश संधे यांनाच पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.
