ज्या पक्षाने दशकांपर्यंत राज्य केले. त्यावर जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे. काँग्रेस देशातील अनेक राज्यात वर्षानुवर्षे सत्तेतून बाहेर आहे. मागील तीन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तीन अंकी संख्याही गाठू शकलेली नाही. २०२४नंतर देशातील ६ राज्य़ात निवडणुका झाल्या पण त्यात काँग्रेस १०० जागाही जिंकू शकलेली नाही.
आजच्या निवडणुकीत आमचे जेवढे आमदार निवडले गेले. तेवढे आमदारही ते निवडून आणू शकलेले नाहीत.
काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आता नकारात्मक राजकारण बनला आहे. काँग्रेसजवळ देशासाठी कोणतेही सकारात्मक व्हिजन नाही. वास्तव हे आहे की काँग्रेस मुस्लिम लिगी माओवादी काँग्रेस बनली आहे. त्याच्यातही एकवेगळा गट तयार होतो आहे. त्यांना ही नकारात्मक भूमिका नको आहे. त्याबद्दल त्यांच्या मनात नाराजी आहे. मला आशा आहे की, पुढे काँग्रेसचे विभाजन होईल, अशा शब्दात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार निवडणुकीतील निकालानंतर दिल्लीत पक्ष मुख्यालयात झालेल्या भाषणात उपरोक्त विचार मांडले.
बिहार निवडणुकीत एनडीएला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले आहे.
कॉग्रेसच्या सहकारी पक्षांनाही कळू लागले आहे की, ते नकारात्मक राजकारणात सगळ्यंना बुडवत आहेत. म्हणूनच मी म्हणालो होतो की, काँग्रेसचे नामदार पाण्यात उडी मारून बिहारच्या निवडणुकीत स्वतः बुडण्याची आणि दुसऱ्यांना बुडवण्याची प्रॅक्टिस करत आहेत, असा टोमणाही मोदी यांनी लगावला.
मोदी म्हणाले की, आजचा विजय माता, बहिणी, मुलींचा आहे ज्यांनी वर्षानुवर्षे आरजेडी सरकारमध्ये जंगलराजचा त्रास सहन केला. हा विजय बिहारच्या नवयुवकांचा आहे ज्यांच्या भविष्याला काँग्रेस, लाल झेंडेवाल्याच्या दहशतीमुळे बरबाद केले गेले. पण ते रेड कॉरिडोर आतंकाचे दिवस आता इतिहास बनले आहेत. बिहार विकासाच्या मार्गाने पुढे जात आहे. ही यात्रा आता थांबणार नाही.
मोदींनी सांगितले की, आजचे हे निकाल विकासविरोधकांना उत्तर आहे जे बेशरमपणे म्हणत असत की बिहारला एक्स्प्रेस वे हायवे नको. बिहारला ट्रेन, एअरपोर्ट कशाला हवा. पण भारताच्या विकासात बिहारच्या लोकांची मोठी भूमिका आहे. ज्या लोकांनी अनेक दशके राज्य केले. त्यांनी नेहमीच बिहारचे खोटे चित्र उभे केले. त्यांनी बिहारला बदनाम केले. त्यांनी बिहारच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख केला नाही, आदरही ठेवला नाही, त्यांची प्रतिष्ठाही ठेवली नाही. छठ पुजेला ते ड्रामा म्हणतात. ते परंपरेचा किती सन्मान करत असतील? यांचा माज बघा. आमचे सरकार छठला युनेस्कोच्या हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करत आहे.
हे ही वाचा:
विजयाचा ‘एमवाय’ फॉर्म्युला म्हणजे महिला आणि युवा!
दिल्ली स्फोटकांचे धागेदोरे मिनी पाकिस्तान बनलेल्या ‘नूंह’मध्ये
लिंगबदल शस्त्रक्रिया जबरदस्तीने केल्याप्रकरणी चौघे जेरबंद
महिला मतदानाच्या ७१% फॉर्म्युल्याने एनडीएला हात
मोदींनी सांगितले, मागील वर्षी देशातील लोकांनी सलग तिसऱ्या वेळेला एनडीएला जनादेश दिला. ६० वर्षांनी ही संधी आली. हा देशाच्या विश्वासाचा, देशवासियांच्या आशीर्वादाचा परिणाम आहे. लोकसभा निवडणुकीनंतर देशाच्या काही राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह विजय मिळविला. हरयाणात जय जवान जय किसानची भावना पुढे नेताना लोकांनी तिसऱ्यांदा सेवेची संधी दिली. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांची पुण्यभुमी असलेल्या महाराष्ट्रात प्रचंड विजय मिळविला. तिसऱ्यांदा विजय मिळाला. २५ वर्षांनी दशाच्या राजधानीत बहुमताने जिंकलो आणि बिहारमध्ये जिथे इतकी मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात आहे, तिथे आम्ही जिंकलो. देशाच्या महानगरात, देशाच्या ग्रामीण भागात, आर्थिक केंद्रात, देशाच्या नारीशक्तीपासून प्रथम मतदान करणाऱ्यांपर्यंत सगळ्या समुदायांनी एनडीएल आशीर्वाद दिला आहे, आशीर्वाद देत आहेत.
भाजपाच्या एनडीए सरकारांना २०-२० वर्षे जनता निवडून देते आहे. ही देशातील प्रो पिपल, प्रो गव्हर्नेस, प्रो डेव्हलपमेंट राजनीतीची स्थापना आहे. हे भारतीय लोकशाहीचा नवा आधार आहे. आम्ही याआधारे बिहारला विकसित करू. देशाला विकसित करू.
आजचा हा विजय एक नव्या यात्रेची सुरुवात आहे. बिहारने जो विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आमच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपविली आहे. मी विश्वास देतो की, येणाऱ्या ५ वर्षात बिहार गतीने पुढे जाईल. बिहारमध्ये नवे उद्योग येतील, बिहारच्या युवकांना तिथेच रोजगार मिळेल यासाठी काम केले जाईल. गुंतवणूक येईल. त्यामुळे नोकऱ्या येतील. पर्यटनाचा विस्तार होईल. जगाला बिहारची नवी ताकद दिसेल. बिहारमध्ये आमच्या तीर्थक्षेत्रांचा, ऐतिहासिक वास्तूंचा कायापालट होईल. बिहार आपल्या स्वागतासाठई तयार आहे. मी देश व जगात विविध देशात रहात असलेल्या बिहारींना सांगतो की, बिहारमध्ये गुंतवणूक करण्याची ही वेळ आहे, असे आवाहन मोदी यांनी केले.
