नवाब मलिकांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

नवाब मलिकांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंडी राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. १०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा कंबोज यांनी दाखल केला आहे. या दाव्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.

आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक हे सुरवातीपासूनच आक्रमक झाले असून त्यांनी एनसीबी आणि भाजपा विरोधात मोर्चा उघडला आहे. सुरवातीपासूनच नवाब मलिक हे पत्रकार परिषदा घेत आरोपांच्या फैरी झाडताना दिसले. यात त्यांनी भाजपा नेते मोहित कंबोज यांच्याशी संबंधित एक व्यक्ती सहभागी असल्याचा दावा केला होता. यानंतर मोहित कंबोज आक्रमक झाले असून त्यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळले होते. तर नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे सांगितले होते.

हे ही वाचा:

गांजा फुकून आरोप करताना थोडा अभ्यास करा

१० दिवसांत महाराष्ट्रात ४ बँका केल्या साफ!

विना हेल्मेट प्रवास करताय? हजार रुपये दंड भरा

भारताचा हा बॉम्ब का वाढवतोय चीन, पाकिस्तानची चिंता?

त्यानुसार मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. शनिवार, ३० ऑक्टोबर रोजी मोहित कंबोज यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. तर त्या आधी त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला नवाब मलिक यांच्यापासून धोका असल्याचे या तक्रारीत म्हटले गेले आहे.

Exit mobile version