आदित्य आणि राज ठाकरे कोण आहेत? मी मुंबईत येणारच

अण्णामलाईंचे सडेतोड प्रत्युत्तर

आदित्य आणि राज ठाकरे कोण आहेत? मी मुंबईत येणारच

मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई चर्चेत आले आहेत. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार करताना अण्णामलाई म्हणाले की, “मुंबई हे केवळ महाराष्ट्राचे नाही, तर आंतरराष्ट्रीय शहर आहे.” या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. या विधानावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिवतीर्थावरील सभेत बोलताना त्यांनी उपरोधिक शब्दांत अण्णामलाई यांना “रसमलाई” अशी हाक मारत, मुंबईच्या मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला.

या टीकेला उत्तर देताना अण्णामलाई यांनी सोशल मीडियावर मिळालेल्या धमक्यांचा उल्लेख केला. “आदित्य आणि राज ठाकरे कोण आहेत? मला धमक्या देणारे कोण?” असा सवाल करत, काही जणांकडून पाय तोडण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांचाही उल्लेख केला धमक्यांना आपण घाबरत नसल्याचे स्पष्ट करत अण्णामलाई म्हणाले, “मी घाबरलो असतो, तर गावात लपून बसलो असतो. पण मी मुंबईत येणारच.” आपण शेतकऱ्याचा मुलगा असून धमकीच्या राजकारणाला भीक घालणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
हे ही वाचा:
गौतम गंभीर नव्हे, माझे वडीलच माझे कोच

“निवडणुकीतील लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नसून ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी”

राष्ट्रीय शेअर बाजारात २०२५मध्ये निफ्टी भक्कम, आयपीओ बाजारात महाराष्ट्र अव्वल

डोनाल्ड ट्रम्प बनले व्हेनेझुएलाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष? नेमकं प्रकरण काय?

यावेळी त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री कामराज यांचा दाखला देत, राजकारण हे धमक्यांवर नव्हे तर विचार, विकास आणि लोकसेवेवर आधारित असावे, असे मत मांडले. मुंबईकडे केवळ प्रादेशिक नजरेतून न पाहता जागतिक शहर म्हणून पाहिले पाहिजे, असे सांगत शहराच्या विकासासाठी ‘ट्रिपल इंजिन सरकार’ आवश्यक असल्याचे अण्णामलाई यांनी नमूद केले. या साऱ्या घडामोडींमुळे भाजप आणि मनसे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version