‘मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मराठीच होईल!’

मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले रोखठोक उत्तर

‘मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मराठीच होईल!’

मुंबईत पूर्वी बाहेरुन मजूर यायचे, आता या शहरात वेगवेगळे लोक येतात. पण मुंबईचं मुंबईपण कुणीही घालवू शकत नाही. मुंबईच्या गणेशोत्सवात पारंपरिक मराठी पद्धतीनेच उत्सव साजरा होतो. त्यामुळे मुंबईची संस्कृती ही टिकवायची आहेच, असे सांगताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की  मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.

हे ही वाचा:

जम्मू- काश्मीरमधून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोघांना अटक

चीनवर नजर, तेजपूर हवाई तळाचा होणार विस्तार

२०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था सुमारे ६ ते ७ टक्क्यांनी वाढणार

दिवंगत मेजरची पीडित मुलगी का म्हणाली, थँक यू योगी अंकल!

फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, मराठी व्होटबँक दुसऱ्यांची आहे भाजपाची नाही हे समजूच नका. मराठी व्होटबँक आमचीही आहे हे लक्षात ठेवा. जर मराठी माणसांनी भाजपाला मतं दिली नसती तर सलग तीन निवडणुकांमध्ये आमचे उमेदवार आले नसते. कुणी काहीही दावा केला तरीही भाजपाच क्रमांक १ चा पक्ष आहे. मराठी, अमराठी सगळेच आमचे मतदार आहेत. मुंबईचं मराठीपण कुणीहीही घालवू शकत नाही. कुणीही कुठूनही आलं तरीही मराठीपण कायम राहणार आहे.

ठाकरे बंधूंबाबत काय म्हणाले फडणवीस?

“मी १०० टक्के ठाकरे बंधूंच्या युतीचं क्रेडिट घ्यायला तयार आहे. बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती पण ते करु शकले नाहीत. ते मी जर करु शकलो तर मराठी माणसाला एकत्रित आणायचं काम मी केलं आहे. पण आता या युतीला खूप उशीर झाला आहे. दोघांची मतं संपल्यावर हे दोघं एकत्र आले आहेत. २००९ मध्ये एकत्र आले असते तर वेगळा रिझल्ट आला असता. आता एकत्रित येऊन काही फायदा नाही. दोघांची मतांची टक्केवारी इतकी कमी आहे की मराठी माणूस आणि अमराठी माणूस यांना मतं देणार नाही. हे दोन भाऊ एकत्र आल्याची आम्हाला काहीही चिंता नाही. आम्ही निश्चितपणे निवडणून येऊ. या दोघांचं प्राबल्य एकाच ठिकाणी आहे. तिथे आमची मतं हललेली नाहीत. त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात अडचणी तयार झालेल्या आहेत.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version