मेट्रोचे श्रेय फडणवीसांना मिळण्याची ठाकरे सरकारला भीती? निमंत्रण पत्रिकेत नाव नाही

मेट्रोचे श्रेय फडणवीसांना मिळण्याची ठाकरे सरकारला भीती? निमंत्रण पत्रिकेत नाव नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याकाळात राज्यातील मेट्रो प्रकल्पाच्या कामाला वेग आला. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेली मेट्रोची कामे आता पूर्ण होत असून महाविकास आघाडी सरकारमार्फत त्याचे उद्घाटन केले जात आहे. पण असे असले तरी देखील या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. निमंत्रण पत्रिकेत त्यांच्या नावाचा साधा उल्लेख देखील नाही. यामुळे सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत आहे.

शनिवार दोन एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मेट्रो २ आणि मेट्रो ७ या मेट्रोच्या दोन मार्गांच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. पण ठाकरे सरकारने या विकास कामांच्या उद्घाटनातही राजकारण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष नेत्याच्या संविधानिक पदावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा साधा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेत झालेला नाही.

हे ही वाचा:

रशिया युक्रेन युद्धाचा भारताला होणार दुहेरी फायदा

‘ऑनलाईन ज्ञान घेऊन ते जीवनात वापरायला हवं’ 

किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर

युक्रेनचं रशियाला प्रत्युत्तर; रशियाच्या ऑईल डेपोवर हल्ला

त्यामुळेच आता महाराष्ट्रात ठाकरे सरकार मार्फत मेट्रो उद्घाटनाच्या श्रेयवादाचे राजकारण करत असल्याचा आरोप होत आहे. तर भाजपाकडूनही ठाकरे सरकारला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे. मुंबई भाजपा मार्फत मुंबई ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता मेट्रो उद्घाटनावरून राज्यात नवा राजकीय कलगीतुरा रंगणार आहे.

Exit mobile version