29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरराजकारणकिरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर   

किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर   

Google News Follow

Related

भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे ठाकरे सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढतच असतात. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई व्हावी म्हणून ते दापोलीला गेले होते त्यानंतर ठाकरे सरकारचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, आज शुक्रवारी किरीट सोमय्या पुण्याला जाणार असून, हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय की, श्री हसन मुश्रीफ सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाई साठी हा दौरा असणार आहे. ४.३० वाजता आयकर आयुक्त इंवेस्टीगेशन पुणे आयकर सदन, सॅलिसबरी पार्क आणि ५.३० वाजता रजिस्ट्रार ऑफ कंपनीस पुणे PCNTDA ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी असा कार्यक्रम असणार आहे.

हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक, शेल आणि बनावट कंपन्यासाठी कलम ४४७ आणि ४३९ कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम २५६ अन्वये कारवाईची मागणी केली आहे.

 

हे ही वाचा:

माणसाच्या आनंदात मुक्या जनावराचा बळी!

‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

महाराष्ट्र राज्य कोरोना निर्बंध मुक्त! सगळे उत्सव उत्साहात साजरे करा!!

हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रातील २७ हजार ग्रामपंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या १० वर्षांपर्यंत जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनी फाइल करणार आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास ५० हजार रुपये द्यावे लागणार होते. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंबंधी तक्रार दाखल केली होती.

हसन मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते. जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. परंतु हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. मागील आठ वर्षात या कंपनीला काहीच आवक नाही. तसेच सन २०१९- २० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. यानंतरही संबंधित कंपनीला कंत्राट दिल्याने किरीट सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा