32 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरराजकारण‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

Related

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकली असून सतीश उके हे हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. या प्रकरणावर आणि एकूणच राजकीय घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. त्यामुळे भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

सतीश उके हे त्यांची लढाई लढत आहेत. ईडीच्या धाडी म्हणजे आता चिंतेचा विषय राहिलेल नाही तर गंमतीचा विषय झाला आहे. आम्ही योग्य ठिकाणी दिलेल्या कागदपात्रांवर आणि पुराव्यांवर एकही कारवाई अद्याप केलेली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्यावर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केले आहे.

विरोधी पक्षाचे नेते आता कर नाही तर डर कशाला, कायद्याने होतंय असं बोलतील. यापूर्वी सत्याचा आणि न्यायाचा तराजू चोर बाजारातील आहे, असं म्हटल्यावर टीका झाली होती. न्याय देणारा तराजू हा नेहमी सरळ हवा. मात्र, भाजपाची सत्ता जिथे नाही तिथे हा तराजू झुकलेला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने विरोधी पक्ष महाराष्ट्रात झुंडशाही निर्माण करतोय, असेही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!

मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’

महाविकास आघाडीचे आणखीन २ नेते तुरुंगात जाणार?

सध्या राजकीय वर्तुळात युपीएची चर्चा सुरू असून संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ किंवा त्याआधी भाजपाला बहुमत मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली तर युपीएची गरज आहे. बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी एनडीए भंगारात काढली, असे संजय राऊत म्हणाले. युपीएसाठी काँग्रेसनेही पुढाकार घ्यायला हवा. पण दुर्दैवाने अद्याप त्यांची मानसिकता दिसत नाहीये. पाच राज्यांच्या पराभवानंतर खर तर त्यांनी पुढे यायला हवे, अशी टीका संजय राऊत यांनी काँग्रेसवर केली. २०२४ ची तयारी करायची असेल तर युपीए आताच भक्कमपणे तयार करायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,975चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा