31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
घरदेश दुनियापंतप्रधान मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

पंतप्रधान मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

जी ७ शिखर परिषदेचे दिले आमंत्रण

Google News Follow

Related

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षी जूनमध्ये इटलीमध्ये होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदींनी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले आणि इटलीच्या पुगलिया येथे होणाऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले, असे परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.

‘पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी संवाद साधला. आज आपला मुक्तिदिन साजरा करणाऱ्या इटलीला शुभेच्छा दिल्या. जूनमध्ये जी ७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जी २० परिषदेत भारताने घेतलेले निर्णय जी७च्या माध्यमातून पुढे नेण्याबाबत आम्ही चर्चा केली. आमची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले. १३ जून ते १५ जून या कालावधीत जी ७ शिखर परिषदेचे सत्र आयोजित केले जातील.

हे ही वाचा:

माझा पुढचा जन्म बहुधा बंगालमध्ये होईल…

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी संदेशखालीत सीबीआयकडून छापेमारी

बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीच्या अध्यक्षतेखाली जी ७ शिखर परिषदेत भारताच्या जी २० अध्यक्षपदाचे महत्त्वाचे परिणाम, विशेषत: जागतिक दक्षिण राष्ट्रांना चालना देण्याच्या मार्गावर चर्चा केली.
दोन्ही जागतिक नेत्यांनी परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची ग्वाही दिली

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा