31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
घरविशेषबोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा

बोटाला शाई दाखवा आणि डोकं हलकं करा

अकोल्यात सलून मालकाचे मतदानाच्या जनजागृतीसाठी प्रयत्न

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा यशस्वी पार पडला असून सध्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या जागांसाठी मतदान सुरू आहे. मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, मतदानाची टक्केवारी वाढवावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती सुरु असते. यासाठी निरनिराळ्या शकला लढविल्या जातात. अशातच आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वसामान्य लोकांनीही जनजागृती मोहीम सुरू केल्याचे चित्र आहे. अकोल्यातील एका सलून मालकाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत अनोखी सवलत देऊ केली आहे.

अकोला शहराच्या रामदास पेठ येथे अनंत कौलकार यांचे हेअर सलूनचे दुकान आहे. त्यांच्या हेअर सलूनमध्ये मतदार जनजागृती अभियान राबवले गेले आहे. “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशा आशयाने त्यांनी जनजागृती मोहीम राबविली आहे. तसेच बोटाला शाई दाखवा आणि मोफत कटींग करा… अशी मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. यामुळे सकाळपासून अनंत कौलकार यांच्या सलूनमध्ये गर्दी झाली आहे. अनेक जण मतदानाचे कर्तव्य बजावून कटींग करण्याठी त्यांच्या दुकानात येत आहे.

हे ही वाचा:

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!

माध्यमांशी बोलताना अनंत कौलकार म्हणाले, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव सुरु झाला आहे. या उत्सवात सर्वच जणांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आहे. शासन-प्रशासन आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. परंतु, त्यांचे हे प्रयत्न अपूर्ण पडतात. यामुळे सर्वसामान्यांनी आपला खारीचा वाटा उचलावा, असे वाटले. यामुळे “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…” हे घोषवाक्य करुन मतदान करुन येणाऱ्यांची मोफत कटींग सुरु केली आहे. त्याला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे अनंत कौलकार यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा