31 C
Mumbai
Sunday, May 26, 2024
घरराजकारण'सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने'

‘सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने’

भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Google News Follow

Related

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (२५ एप्रिल) पत्रकार परिषद घेत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.ठाकरे गटाने या जाहीरनाम्याला ‘वचननामा’ असे नाव दिले आहे.दरम्यान, ठाकरे यांच्या वचननाम्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटकरत म्हटले की, सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने !!
महाराष्ट्रात प्रकल्पांना वसूलीसाठी विरोध करुन ज्यांनी पळवून लावले.. ते सांगत आहेत..

  • वित्तीय केंद्र नव्याने उभे करणार
  • जिल्ह्यात रोजगार देणार

कोरोना मध्ये ज्यांनी खिचडी, बॉडी बॅगमध्ये पण भ्रष्टाचार केला ते सांगत आहेत..

  • जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करणार

हे ही वाचा:

पॅलेस्टाईन समर्थक आंदोलनात भाग घेतल्याबद्दल भारतीय विद्यार्थिनीला अटक

दिल्ली विमानतळावर फिरत होता सिंगापूर एअरलाईन्सचा बनावट पायलट!

बॅलेट पेपर नाही; ईव्हीएमवरच होणार निवडणुका!

बेंगळुरूची हैदराबादवर मात!

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत करु म्हणाले आणि सत्ता आल्यावर विसले ते आता सांगत आहेत..

  • पिक विमांचे निकष बदलणार
  • शेतकऱ्यांना लागणारे खते, बियाणे जीएसटी मुक्त करु

भारतच्या एकात्मतेला छेद देण्यासाठी काँग्रेसने जो तुकडे तुकडे गँगचा जाहीरनामा मांडला त्यालाच पुढे नेण्यासाठी उबाठा सांगत आहे..

  •  सत्तेचे विकेंद्रीकरण करु
  • कर दहशतवाद थांबवू

थोडक्यात काय तर..भूमिकांमध्ये युटर्न फेम असलेले आणि दिला शब्द न पाळणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या हातून “वचननामा” प्रकाशना प्रसंगी निसटला…सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने !!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा