शरद पवरांचा लस घेतानाचा फोटो ‘नौटंकी’ नाही

शरद पवरांचा लस घेतानाचा फोटो ‘नौटंकी’ नाही

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “मी लस घेतली पण फोटो काढायची नौटंकी केली नाही.” असे विधान अजित पवार यांनी केले. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. पण आता या वक्तव्यावरुन अजित पवार ट्रोल होताना दिसत आहेत. कारण नेटिझन्सनी शरद पवार यांचे लस घेतानाचे फोटो आणि ट्विट्स समोर आणले आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात कोरोना संदर्भातील महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत पुण्याचे महापौर आणि इतर प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. ही बैठक झाल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन एप्रिलला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

हे ही वाचा:

२ एप्रिलला पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय?

भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार

पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार

फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला

यावेळीच अजित पवार यांनी लसीकरणावरही भाष्य केले. “मी लस घेतली पण फोटो काढून नौटंकी केली नाही.” असे विधान अजित पवार यांनी केले. यानंतरच नेटिझन्सने अजित पवार यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. एक मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत कोविड १९ ची लस घेतल्याचे जाहीर केले होते. यावेळी शरद पवार यांनी आपले लस घेतानाचे फोटो टाकले होते. हे ट्विट आणि फोटज नेटिझन्सकडून व्हायरल होत आहेत.

आमदार भातखळकरांनीही साधला निशाणा
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सुद्धा अजित पवारांना टोला लगावला आहे. शरद पवारांचा लास घेतानाच फोटो आणि अजित पवार यांच्या विधानाचा स्क्रिनशॉट भातखळकर यांनी ट्विट केला आहे.

Exit mobile version