आझाद मैदानातील मराठा आरक्षण मोर्चा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत मनोज जरांगे यांच्यासह सहा जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश नोटिसाद्वारे देण्यात आले आहेत.
२८ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे झालेल्या मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. उपोषणासाठी दोन दिवसांची परवानगी देऊनही हे उपोषण चार दिवस सुरू राहिले. मोर्चादरम्यान मोठ्या संख्येने आलेल्या गर्दीमुळे सीएसएमटी परिसरात वाहतूक कोंडी झाली, रस्ते अडवले गेले आणि मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले.
हे ही वाचा:
‘ऑपरेशन सिंदूर एक शौर्य गाथा व आत्मनिर्भर भारत’ वर रविवारी व्याख्यान
सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी या रविवारी काय करावे?
पत्नीस ठार मारून पतीने दाखल केली हवल्याची तक्रार
आरएसएस हे संपूर्ण जगातील सर्वात विलक्षण संघटन
यासंदर्भात ३ सप्टेंबर रोजी आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील आणि आयोजकांसह ७ ते ८ जणांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांसह म.पो.का.च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता चौकशी प्रक्रियेअंतर्गत जरांगे पाटीलसह सहा जणांना नोटिसा पाठवून उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.
