पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॅन्स यांच्याशी चर्चा

पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॅन्स यांच्याशी चर्चेदरम्यान स्पष्ट सांगितले की, भारत-पाकिस्तान दरम्यान आता एकच विषय चर्चेसाठी शिल्लक आहे तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर (PoK) भारताला परत करण्याचा.

मोदी म्हणाले की,  “आमची काश्मीरबाबत भूमिका स्पष्ट आहे.  एकच मुद्दा शिल्लक आहे, तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीरला परत करण्याचा.  त्याशिवाय दुसरी कोणतीही चर्चा होणार नाही. जर ते दहशतवाद्यांना ताब्यात देण्याविषयी बोलू इच्छितात तर त्यावर चर्चा होईल. अन्य कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी नाही. ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. आपण आता नवीन बदललेल्या परिस्थितीत आहोत. जगाने हे स्वीकारले पाहिजे. पाकिस्तानने हे स्वीकारले पाहिजे. आधीसारखे संबंध राहू शकत नाहीत.

मध्यस्थी नको 

यानिमित्ताने मोदी म्हणाले की, आम्हाला कोणत्याही प्रकारची मध्यस्थी नको आहे. आम्हाला कोणाची गरज नाही.

पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सुरू झाला. भारतानेपाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादाचे तळ उद्ध्वस्त केले. त्यासाठी अनेक क्षेपणास्त्रे वापरण्यात आली. अनेक अतिरेकी त्यात मारले गेले. पाकिस्तानमध्ये लपलेला मसूद अझर याच्या कुटुंबातील १० लोकांचा या हल्ल्यात बळी गेला. त्यानंतर पाकिस्तानातील ११ एअर बेसही भारताने उद्ध्वस्त केले. त्यांचे एअर डिफेन्स सिस्टिमला भारताने तडाखे दिले. त्यांची दोन जेटही भारताने पाडली. चिनी बनावटीच्या शस्त्रसामुग्रीचा फोलपणा या संघर्षात स्पष्ट झाला. पाकिस्तानला चीनने ही शस्त्रास्त्रे पुरविली होती.

Exit mobile version