अभिजीत दिपकेचा शिक्षणाचा खर्च कुणी केला ?

निवडणूक आयोग, आयकर विभागाकडे तक्रार दाखल

अभिजीत दिपकेचा शिक्षणाचा खर्च कुणी केला ?

कॉकरोच जनता पार्टी (CJP)चा संस्थापक अभिजीत दिपके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या आंदोलनामुळे नव्हे, तर त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेल्या तक्रारीमुळे. सुरतमधील माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीतच्या कुटुंबाच्या मालमत्तेची, उत्पन्नाची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करत निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीत अभिजीतचे वडील भगवानराव दिपके हे महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचारी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांचे मासिक उत्पन्न सुमारे ६० ते ६५ हजार रुपये असताना मुलांच्या अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी लागलेला मोठा खर्च कसा भागवण्यात आला, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच उत्पन्नाचे स्रोत, मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्याची विनंतीही संबंधित विभागांना करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
जहाजबांधणीचा प्रयोग नवा; भारताच्या शिडात प्रगतीची हवा

पावसाळ्यात अंडी खाण्याची सवय ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर

पावसाळ्यात चहा किती प्यावा?

झुरळांना पंख फुटले ; पाय आभाळाला लागले!

याशिवाय, अभिजीतच्या कॉकरोच जनता पार्टीची अधिकृत राजकीय पक्ष म्हणून नोंदणी नसतानाही पक्षाच्या नावाने विविध उपक्रम आणि निधी उभारला जात असल्याचा मुद्दाही तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. विशेषतः कायदेशीर लढ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या १ कोटी रुपयांच्या लीगल फंडची वैधता तपासण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच या निधीवर जीएसटी लागू होतो का, याचीही चौकशी करण्याची मागणी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडे (CBIC) करण्यात आली आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांवर अभिजीत किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या तक्रारीमुळे अभिजीतच्या आर्थिक पार्श्वभूमीवर आणि त्याच्या संघटनेच्या निधी उभारणीच्या पद्धतीवर नवे प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणा याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या प्रकरणात केवळ चौकशीची मागणी करण्यात आली असून, कोणत्याही आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Exit mobile version