पुणे महापालिकेत भाजपची सत्ता कायम राहणार

एक्झिट पोलमधून मोठे संकेत

पुणे महापालिकेत भाजपची सत्ता कायम राहणार

पुणे महापालिका निवडणुकीतील एक्झिट पोलचे प्राथमिक संकेत समोर आले असून, शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्राब (Political Bureau and Analysis Bureau) या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेतील एकूण १६२ जागांपैकी भारतीय जनता पक्ष ला सुमारे ९१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकदा पुणे महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरण्याची आणि स्पष्ट बहुमतासह सत्तास्थापना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा :
एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेना महायुती अव्वल

“पुरुष गरोदर होऊ शकतात का?”

सोन्याचे दर पुन्हा वाढले

अंडर-१९ विश्वचषकात भारताचा दबदबा

एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला अंदाजे ४३ जागा मिळू शकतात. मात्र या आकडेवारीमुळे अजित पवार गटाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सुमारे ७ जागांवर, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुमारे ८ जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. उर्वरित जागा इतर लहान पक्ष व अपक्षांच्या वाट्याला जाण्याचा अंदाज आहे.

प्राब पुणे महापालिका अंदाज

भाजप – 91

राष्ट्रवादी – 43

शिवसेना- 7

काँग्रेस – 8

या आकडेवारीनुसार भाजपला महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळण्याचे संकेत मिळत असून, पुण्यातील सत्तासमीकरण भाजपच्या बाजूने झुकताना दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत अजित पवार यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते, मात्र एक्झिट पोलचे अंदाज पाहता त्यांना अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, राज्यभरात १५ जानेवारी रोजी २९ महानगरपालिकांसाठी मतदान पार पडले आहे. पुणे हे त्यातील एक महत्त्वाचे राजकीय केंद्र मानले जाते. त्यामुळे १६ जानेवारी रोजी जाहीर होणाऱ्या अधिकृत निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असून, एक्झिट पोलचे हे अंदाज प्रत्यक्ष निकालात कितपत खरे ठरतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version