मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!

सरसंघचालक मोहन भागवत यांचे उद्गार

मुस्लिम, ख्रिश्चनांसाठी संघाचे दरवाजे उघडे, पण भारतमातेचे पुत्र म्हणून या!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात हे स्पष्ट केले की,  सर्व धर्मांचे लोक मग ते मुस्लीम असो की ख्रिश्चन, संघात सहभागी होऊ शकतात, पण हिंदू समाजाचा भाग म्हणून, धार्मिक वेगळेपणा बाजूला ठेवून.

ही विधाने आरएसएसच्या “१०० वर्षांचा प्रवास: नवे क्षितिज” या अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात प्रश्नोत्तर सत्रादरम्यान करण्यात आली.

एका प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना सांगितले, संघामध्ये कोणत्याही ब्राह्मणाला परवानगी नाही. इतर कोणत्याही जातीला परवानगी नाही. कोणत्याही मुस्लीमला, ख्रिश्चनला परवानगी नाही… फक्त हिंदूंना परवानगी आहे.”

तथापि त्यांनी स्पष्ट केले,  पण वेगवेगळ्या पंथांचे लोक मुस्लीम, ख्रिश्चन संघात येऊ शकतात, पण तुमचा धार्मिक वेगळेपणा बाहेर ठेवा. तुमची विशेषता स्वागतार्ह आहे, पण शाखेत आल्यानंतर तुम्ही भारतमातेचे पुत्र म्हणून, हिंदू समाजाच्या सदस्य म्हणून याल.”

ते पुढे म्हणाले, दैनिक शाखेला कोण येतो याची जात किंवा धर्म आम्ही विचारत नाही. मुसलमान येतात, ख्रिश्चन येतात, जसे इतर सर्व जातीतले हिंदू येतात. पण आम्ही कुणाची संख्या मोजत नाही. आम्ही सर्व भारतमाता पुत्र आहोत. हीच संघाची  कार्यपद्धती आहे.

आरएसएसची नोंदणी?

काँग्रेसकडून विचारण्यात येणाऱ्या आरएसएसच्या नोंदणी आणि निधीसंबंधी प्रश्नांना उत्तर देताना भागवत म्हणाले, आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली. मग ब्रिटिश सरकारकडे जाऊन काय नोंदणी करायची होती? स्वातंत्र्यानंतर नोंदणी बंधनकारक नव्हती. त्यांनी सांगितले की संघाला ‘व्यक्तीसमूहाचे संघटन’ म्हणून मान्यता आहे व आयकर कायद्यात सूट आहे.

सरकारच्या पूर्वीच्या बंदीचा उल्लेख करत ते म्हणाले, आम्हाला तीनदा बंदी घातली गेली. जर आम्ही अस्तित्वात नसू, तर सरकारने कोणाला बंदी घातली?

हे ही वाचा:

वैश्विक आर्थिक वाढीत भारताचा वाटा ८-१० टक्के

कोरड्या त्वचेतून कसा मिळतो आराम

मधुबनीला घुसखोरांचं लॉंचिंग पॅड होऊ द्यायचं नाही

महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’

तिरंगा आणि भगवा यावर भूमिका

राष्ट्रीय ध्वजाबाबतच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही नेहमी तिरंग्याचा सन्मान करतो आणि संरक्षण करतो. भगवा संघात गुरुचं प्रतीक आहे, पण तिरंग्याचा अपमान होत नाही.

राजकारणापासून संघाचे अंतर

सरसंघचालक भागवत म्हणाले, आम्ही मतांच्या राजकारणात, निवडणुकीत सहभागी होत नाही. संघाचे काम समाज एकत्र करणे आहे, आणि राजकारण स्वभावतः विभाजन करणारे असते. तथापि, देशहिताच्या धोरणांना समर्थन असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानावर भूमिका

भारत–पाक संबंधांवर त्यांनी म्हटले, शांतता पाकिस्तानच्या हातात आहे. तो भारताला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहिला तर एक दिवस धडा शिकेल. जसे १९७१ मध्ये झाले.”

जात आणि ‘लव्ह जिहाद’बद्दल मत

जातिवादावर बोलताना भागवत म्हणाले, जात संपलेली आहे, पण जातिचा गोंधळ आहे, जो राजकारणामुळे व सवलतींमुळे आहे. जात नष्ट करण्याची गरज नाही, ती विसरण्याची गरज आहे.

‘लव्ह जिहाद’ संदर्भात ते म्हणाले, इतर काय करतात यावर लक्ष केंद्रित न करता, आपल्या घरात हिंदू संस्कार मजबूत करा.

Exit mobile version