डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘हिंदू- काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान

बोरिवलीत ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन

डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे ‘हिंदू- काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान

मुंबईतील बोरिवलीमध्ये रविवार, ५ एप्रिल २०२५ रोजी ‘सकल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘गिरगाव कथा’ प्रस्तुत या संमेलनाचे आयोजन बोरिवली विचार मंचतर्फे करण्यात आले आहे. हे संमेलन रविवारी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत नाना पालकर स्मृती समितीच्या प्रांगणात, नाना पालकर स्मृती समिती मार्ग, बाभई नाका, बोरिवली (प.) येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचा मुख्य विषय ‘हिंदू – काल व आज’ असा असून, या विषयावर प्रख्यात प्रवचनकार, निरुपणकार आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद सुरेश शेवडे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदू समाजाचा इतिहास, वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील दिशा यावर ते आपले विचार मांडणार आहेत. सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि जागतिक परिस्थितीत हिंदू समाजामध्ये जागरूकता आणि एकता निर्माण करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. “धर्मो रक्षति रक्षितः” या तत्त्वावर आधारित हा उपक्रम धर्मरक्षणासाठी आणि समाजजागृतीसाठी एक व्यासपीठ ठरणार आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानात तेलासोबत वीज संकट; कोळशाच्या कमतरतेमुळे ३०% वीज उत्पादन धोक्या

“पाकिस्तानमधील ८०% लोक समलैंगिक आणि २०% उभयलिंगी आहेत”

बहिणीशी वाद घालणाऱ्यांवर झाडल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

पश्चिम आशिया संकटावर काँग्रेस दुभंगली

संमेलनाद्वारे हिंदू संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे जतन करण्यासोबतच नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मजागृतीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version