संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

संग्राम थोपटेंनी काँग्रेसविरोधात दंड थोपटले, भाजपात केला प्रवेश!

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला आहे. २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याची नुकतीच घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज (२२ एप्रिल) त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत खंत व्यक्त केली. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये निष्ठेने काम केलं पण फळ मिळालं नाही.

संग्राम थोपटे यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी थोपटेंसह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले.

भाजपात प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, लोकसभेला आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला होता. काँग्रेस पक्षात निष्ठेने काम केलं. मात्र त्या निष्ठेचे फळ मिळालं नाही. तळागाळात काँग्रेस वाढविण्याचा काम आम्ही केलं. थोडसं दुःख वाटतंय, खंत वाटते. काँग्रेस पक्ष तळागाळात वाढवला आणि आज या निर्णयावर पोहोचलो आहे. भाजप देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम करत असणारा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची चालणारी वाटचाल पाहता सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा पक्षप्रवेश करत आहे, असे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा : 

“प्रसिद्ध कृष्णा: आयपीएलमध्ये चमकते भविष्य!”

पंतप्रधान मत्स्य संपदा योजना ठरली माजी सैनिकाला आधार

मोठ स्वप्न बघण्यासाठी पंतप्रधान मोडी प्रेरणा देतात

गोड, चरबीयुक्त अन्न मेंदूवर परिणाम करते

ते पुढे म्हणाले, मी आभार मानतो, आज भाजपने पक्षप्रवेश दिला. भाजपचे काम इमानीइतबरी पुढे करेल, हा शब्द मी देतो. जे काम काँग्रेसचे आम्ही केले. त्याच पद्धतीने भाजपचे काम येत्या काळात करू.

दरम्यान, संग्राम थोपटेंच्या राजीनाम्याने पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे चित्र आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे ही काँग्रेसचे आमदार होते. जनसंपर्कही त्यांचा दांडगा होता. पवार कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात थोपटे यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला होता. परंतु आता त्यांच्या राजीनाम्याने जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन कमकुवत होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version