पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा १४ जून रोजी पार पडणार आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देहू संस्थान आणि पोलीस विभागामार्फत जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांना देहू संस्थानकडून तुकोबांची पगडी आणि उपरणे तयार करण्यास सांगितले आहे. ही पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १४ तारखेच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यात येणार आहे.

गेल्या तीन- चार दिवसापासून पगडी आणि उपरणे तयार करत असल्याची माहिती गिरीश मुरुडकर यांनी दिली आहे. या पगडीचे आणि उपरण याच वैशिष्ट म्हणजे याला वेगळे कापड वापरले गेले आहे. बदामी रंगाच्या रेशमी वस्त्राची तुळशीच्या मण्यांचा वापर करून ही पगडी बांधण्यात आली आहे. पगडीच्या मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आहे.

‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हा अभंग पगडीवर रेखाटला आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील. सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतिके ठेवण्यात आली आहेत. उपरण्यावर दोन्ही बाजूला तुकाराम महाराजांचा मराठी आणि हिंदी अभंग कोरण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मलिकांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली

राज्यसभा निवडणूक मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी?

‘आंदोलन करून कार्यकर्ते पंकजा मुंडेंचं नुकसान करणार’

१८ जुलैला होणार राष्ट्रपती पदासाठी निवडणूक

येत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. तसेच सोहळ्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूला भेट देणार असल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

Exit mobile version