मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार आता आपापल्या प्रभागात तयारीला लागला असून जनसंपर्क केला जात आहे. प्रचार कार्यालयाच्या माध्यमातून लोकांशी अधिकाधिक संवाद साधला जात आहे. भाजपाच्या वॉर्ड क्रमांक २४ येथे भाजपा–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या उमेदवार स्वाती संजय जयस्वाल यांच्या बिहारी टेकडी रोड, पोईसर येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते झाले. स्वाती संजय जयस्वाल यांना जनतेचे चांगले समर्थन मिळते आहे. कार्यकर्ते सुद्धा जबरदस्त मेहनत करत आहेत, अशी टिप्पणी आमदार भातखळकर यांनी केली.
हे ही वाचा:
‘एअरोनॉटिक्स २०४७’ चा बेंगळुरूत शुभारंभ
संजय कांबळे यांचा प्रचाराचा झंझावात
सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये १.२३ लाख कोटी रुपयांची वाढ
फ्लाइटमध्ये पॉवर बँक वापरण्यावर बंदी
स्वाती जयस्वाल यांनी आपल्या सर्व मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून त्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रभागातील समस्यांची जाण असलेल्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे नागरिकांकडून त्यांचे उत्साहात स्वागतही होत आहे.
