बिनविरोध प्रकरणी न्यायालयाने सरोदेंना खडसावले, ठोठावला दंड

मनसेच्या अविनाश जाधव यांनी केली होती याचिका

बिनविरोध प्रकरणी न्यायालयाने सरोदेंना खडसावले, ठोठावला दंड

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याबाबत मनसेने उपस्थित केलेला मुद्दा न्यायालयात टिकू शकला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने मनसे नेते अविनाश जाधव यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. याचिकेत केलेले आरोप आधारहीन असून, त्याला कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

राज्यातील विविध महापालिकांमध्ये 60 हून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली होती. मनसेकडून बिनविरोध निवडीमागे दबाव, धमकी आणि प्रलोभन असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने हे आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, उदाहरणे किंवा अधिकृत नोंदी सादर करण्यात न आल्याचे नमूद केले.
हे ही वाचा :
भारतीय मैदानावर गिलचीच हवा!

“उत्तर भारतात महिलांना घरीच राहण्यास सांगितले जाते” द्रमुक खासदार बरळले

भारत करणार ११४ राफेल विमानांसाठी ३.२५ लाख कोटी रुपयांचा करार

पालक पनीर वरुन वाद, अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांनी जिंकला लढा
ही याचिका अविनाश जाधव आणि समीर गांधी यांनी दाखल केली होती. केडीएमसी आणि ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडी झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणात मनसेच्या वतीने असीम सरोदे यांनी युक्तिवाद केला.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, निवडणूक कायद्याच्या तरतुदींचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. गंभीर आरोप करताना पुरावे सादर करणे आवश्यक असते, मात्र या प्रकरणात तसे झाले नाही.

यामुळेच न्यायालयाने याचिका फेटाळून लावत वकील असीम सरोदे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आणि न्यायालयीन प्रक्रियेत जबाबदारीने वागण्याची स्पष्ट भूमिका घेतली.

Exit mobile version