बिश्केकमध्ये आशियाई कुस्तीत अमन, सुजीतकडून अपेक्षा

ग्रीको रोमनने होणार स्पर्धेची सुरुवात

बिश्केकमध्ये आशियाई कुस्तीत अमन, सुजीतकडून अपेक्षा

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक ब्राँझ विजेता अमन सेहरावत भारताचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा बिश्केक येथे होणार असून, यापूर्वी २०१८ आणि २०२४ मध्येही येथेच आयोजन करण्यात आले होते.

ही स्पर्धा दोन दिवसांच्या स्वरूपात होणार आहे. स्पर्धेची सुरुवात ग्रीको-रोमन प्रकाराने होईल, त्यानंतर महिला कुस्ती आणि मग फ्रीस्टाइल प्रकार होईल. या चॅम्पियनशिपमध्ये सुमारे ३५० पैलवान ३० सुवर्णपदकांसाठी स्पर्धा करणार आहेत. भारताकडून एकूण ३० कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

अमन सेहरावतने ५७ किलो गटात ऑलिम्पिक पदक जिंकले आणि २०२३ मध्ये आशियाई विजेतेपद पटकावले, ते आता पुरुषांच्या नॉन-ऑलिम्पिक ६१ किलो गटात स्पर्धा करतील. २२ वर्षीय या खेळाडूने या गटात ग्रां प्री स्तरावरही पदके जिंकली आहेत. याच वर्षी त्यांनी झाग्रेब ओपनमध्ये रौप्यपदक मिळवले.

तसेच, उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेले  सुजीत कलकल हा ६५ किलो गटातील सध्याचे २३ वर्षाखालील गटाचा विश्वविजेता आहे. तोही या स्पर्धेत सहभागी होत आहे. भारतासाठी ५७ किलो गटाव्यतिरिक्त शेवटचे आशियाई विजेतेपद २०१९ मध्ये मिळाले होते, जेव्हा बजरंग पुनियाने शियान येथे ६५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. आता सुजीत हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भारतीय महिला कुस्ती संघात वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती अंतिम पंघल सहभागी होणार नाही. मागील महिन्यातील नॅशनल ट्रायल्समध्ये ५३ किलो गटात स्थान मिळवण्यासाठी झालेल्या सामन्यात तिला मीनाक्षी गोयतकडून पराभव स्वीकारावा लागला. गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावर अंतिमचा हा पहिलाच पराभव होता.

२०२५ च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये ६२ किलो गटात सुवर्णपदक जिंकणारी मनिषा भानवाला यंदा ५७ किलो गटात खेळेल, तर ६२ किलो गटात मानसी अहलावत स्पर्धा करेल. ग्रीको-रोमन प्रकारात पाच वेळा एशियन चॅम्पियनशिप पदक विजेते सुनील कुमार (८७ किलो) भारतीय आव्हानाचे नेतृत्व करतील.

जॉर्डनमधील अम्मान येथे झालेल्या मागील स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एकूण १० पदके जिंकली होती, ज्यामध्ये १ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश होता.

हे ही वाचा:

पाकिस्तानला नवी खुमखुमी, म्हणतो आम्ही कोलकातापर्यंत शिरू!

ट्रम्पच्या युद्धाच्या निर्णयाने अमेरिका महामंदीच्या उंबरठ्यावर

भारताच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्र आघाडीवर

७ वर्षांनंतर भारताची इराणकडून पहिली तेल खरेदी

भारतीय संघ असा असेल

महिला:
नीलम सिरोही (५० किलो), मीनाक्षी गोयत (५३ किलो), हंसिका लांबा (५५ किलो), मनीषा भानवाला (५७ किलो), नेहा सांगवान (५९ किलो), मानसी अहलावत (६२ किलो), मोनिका (६५ किलो), मानसी लाठर (६८ किलो), हर्षिता (७२ किलो), काजल धोचक (७६ किलो)

पुरुष फ्रीस्टाइल:
अंकुश (५७ किलो), अमन सहरावत (६१ किलो), सुजीत कालकल (६५ किलो), अभिमन्यु (७० किलो), जयदीप (७४ किलो), संदीप सिंह मान (७९ किलो), मुकुल दहिया (८६ किलो), पुनीत कुमार (९२ किलो), विक्की (९७ किलो), दिनेश (१२५ किलो)

ग्रीको-रोमन:
ललित (५५ किलो), साहिल (६० किलो), सनी कुमार (६३ किलो), सचिन सहरावत (६७ किलो), अनिल (७२ किलो), अमन (७७ किलो), प्रिंस (८२ किलो), सुनील कुमार (८७ किलो), नितेश (९७ किलो), जोगिंदर राठी (१३० किलो)

Exit mobile version