मुंबई शरीरसौष्ठवाची सर्व अंग आली एकत्र

कीर्तीकरांच्या पुढाकाराने पाच शरीरसौष्ठव संघटना एकवटल्या

मुंबई शरीरसौष्ठवाची सर्व अंग आली एकत्र

अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. विखुरलेली ताकद, तुकड्यांत विभागलेली संघटना आणि त्यामुळे मागे पडलेले खेळाडू या सर्वांना आता एकजुटीचा ताकद मिळाली आहे. शरीरसौष्ठव खेळाचे आधारस्तंभ आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांच्या पुढाकाराने मुंबईतील पाच प्रमुख शरीरसौष्ठव संघटना एका ध्येयाखाली एकत्र आल्या असून, आता राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मुंबईचा झेंडा पुन्हा दिमाखात फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

भारतीय शरीरसौष्ठवात मुंबईला नेहमीच ‘पंढरी’ मानले जाते. देशातील सर्वाधिक दर्जेदार शरीरसौष्ठवपटू घडवणारी ही माती गेली अनेक वर्षे संघटनात्मक फुटीमुळे कमकुवत होत होती. एकेकाळी राष्ट्रीय स्पर्धांवर वर्चस्व गाजवणारे मुंबईचे खेळाडू निवड प्रक्रियेतील गोंधळ, संघटनांतील संघर्ष आणि अंतर्गत मतभेदांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे पडत होते. परिणामी, जागतिक दर्जाच्या अनेक खेळाडूंना सन्मान, पुरस्कार आणि संधींपासूनही वंचित राहावे लागत होते.

ही खंत दूर करण्यासाठी बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर आणि जागतिक संघटनेचे एक्झिक्यूटिव्ह असिस्टंट टू द प्रेसिडेंट व आयबीबीएफचे कायदेशीर सल्लागार विक्रम रोठे यांनी पुढाकार घेतला. विक्रम रोठे यांच्या सहकार्याने सलग चर्चांची मालिका राबवण्यात आली आणि अखेर पाचही संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यात यश आले.

मुंबईच्या शरीरसौष्ठव इतिहासात हा निर्णय ‘टर्निंग पॉइंट’ मानला जात आहे. एकत्रित संघटनात्मक शक्तीमुळे आता खेळाडूंना अधिक पारदर्शक निवड प्रक्रिया, दर्जेदार प्रशिक्षण, प्रायोजकांचे पाठबळ आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अधिक भक्कम प्रतिनिधित्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा:

बनावट आधारकार्डसह नागरिकत्वाचे दस्तऐवज बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

विश्वविजयानंतर जेमिमाची चॅम्पियन्स ट्रॉफीवर नजर!

सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा ‘चेकमेट’! सिंडारोववर दमदार विजय

भातखळकरांच्या प्रयत्नांमुळे सोसायट्यांचे मुद्रांक शुल्क घटले

संघटनांच्या या ऐतिहासिक एकीमुळे मुंबईचा ‘बालेकिल्ला’ पुन्हा अभेद्य बनल्याची भावना शरीरसौष्ठव विश्वात व्यक्त होत आहे. राज्यातील शरीरसौष्ठव चळवळीला यामुळे नवे नेतृत्व, नवी दिशा आणि नव्या युगाची सुरुवात मिळाल्याचे मानले जात आहे.

 

ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन, मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशन, डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन मुंबई, बॉडी बिल्डर्स असोसिएशन ऑफ मुंबई, बॉडी बिल्डिंग आणि फिजिक असोसिएशन, मुंबई या सर्व असोसिएशन यापुढे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई सबर्बन बॉडी बिल्ड गणपती बॅनरखाली त्यांचे कामकाज पाहतील.

कीर्तीकरांचे ४० लाखांचे पाठबळ

शरीरसौष्ठवातील ऐतिहासिक एकीचे सूत्रधार ठरलेल्या गजानन कीर्तीकर यांनी केवळ संघटनांना एकत्र आणण्याचे काम केले नाही, तर आगामी ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी सीएसआर अंतर्गत तब्बल ४० लाख रुपयांचा निधी उभारून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पुढील महाराष्ट्र श्री स्पर्धा मुंबईमध्ये होण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत.

कीर्तीकरांच्या या घोषणेनंतर व्यायाममहर्षी मधुकर तळवळकर यांनीही ५ लाख रुपयांची रोख मदत जाहीर केली. या आर्थिक पाठबळामुळे महाराष्ट्र श्री स्पर्धेला अभूतपूर्व व्याप्ती, दर्जेदार आयोजन आणि देशभरातील बलाढ्य शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या सर्व संघटनांच्या एकत्रीकरण सभेस मुंबईतील सर्व संघटनांचे ८५ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनचे आजीवन अध्यक्ष श्री अमोल कीर्तिकर यांचेही मार्गदर्शन लाभले.

डब्लूबीपीएफचे सरचिटणीस चेतन पाठारे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र चव्हाण, शरद मारणे आणि व्यायाम महर्षी मधुकर तळवळकर हे उपस्थित होते. या सर्वांसोबत मनोहर पांचाळ,  किट्टी फनसेका, मनीष आडविलकर, मोतीराम केणी उपस्थित होते.
सर्व संघटनांचे एकत्रीकरण घडवून आणल्याबद्दल उपस्थित सर्वांनी अजय खानविलकर आणि विक्रम रोठे यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version