२४ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यान रांची येथे ४थी दक्षिण आशियाई वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२५ आयोजित करण्यात आली होती. हर्ष राऊतने १०० मीटरमध्ये कांस्यपदक आणि ४ x १०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक जिंकले. वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत १०० मीटरमध्ये पदक मिळवणारा तो ठाणे जिल्ह्यातील पहिला पुरुष खेळाडू आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष का चिघळला?z
स्वस्थ भारतच विकसित भारताची पायाभरणी
‘दारू पिऊन गाडी चालवणारे दहशतवादी’
ब्लिंक इट, ओला आणि उबेरमध्ये बांगलादेशी घुसखोर!
हर्ष म्हणाला, “हे माझे पहिले आंतरराष्ट्रीय पदक आहे. अंतिम फेरीत मी थोडे चांगले करू शकलो असतो पण माझ्या कामगिरीवर मी खूप आनंदी आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी माझ्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा आभारी आहे.” “हर्षचा हंगाम खूप प्रदीर्घ होता आणि ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. या स्पर्धेत भाग घेऊन त्याने खूप चांगला अनुभव मिळवला आहे जो त्याला भविष्यातील स्पर्धांमध्ये मदत करेल. या हंगामात हर्ष त्याच्या कामगिरीशी सातत्य राखत आहे, असे त्याचे प्रशिक्षक निलेश पाटकर म्हणाले. मीनल पलांडे आणि अशोक आहेर – योजना प्रमुख टीएमसीएपीवाय यांनी हर्ष आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
