ब्लिंक इट, ओला अन उबेरसारख्या डिलिव्हरी आणि टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये बांगलादेशी घुसल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या सर्वांना हाकलून लावण्याची मागणी त्यांनी महायुती सरकारकडे केली आहे. ब्लिंक इट, ओला आणि उबेरच्या चालक, डिलिव्हरी बॉईजच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहण्याची विनंती त्यांनी कामगार मंत्री आकाश फंडकर यांच्याकडे केली आहे. याबाबत मंत्र्यांना पत्रही लिहिले आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली तसेच मंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची कॉपीही पोस्ट केली.
गेल्या काही महिन्यांत मुंबईत ब्लिंकिट कंपनीचे मोठ्या प्रमाणावर विस्तारकाम सुरू झाले आहे. “१० मिनिटांत डिलिव्हरी” या संकल्पनेच्या नादात कंपनीकडून मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉयची भरती केली जात आहे. मात्र, या घाईगडबडीत अनेक डिलिव्हरी कर्मचारी बेफाम आणि बेदरकारपणे दुचाकी चालवत असल्याचे दिसून येते. त्यापैकी बऱ्याच जणांना वाहतूक शिस्त, रस्ते सुरक्षा नियमांचे पुरेसे ज्ञान नसल्याने, ते रस्त्यावर गोंधळ निर्माण करत आहेत. यामुळे मुंबईत वाहतुकीची कोंडी वाढत असून, सामान्य प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
याबाबत स्वतः राहत असलेल्या ठिकाणी म्हणजेच नीलम नगर, मुलुंड (पूर्व) सोसायटीत ब्लिंकिटने एक अनधिकृत स्टोर / वितरण केंद्र चालू असल्याचे त्यांनी सांगितले. ते पत्रात म्हणाले, महापालिकेच्या समाज कल्याण केंद्रात त्यांनी हे वितरण केंद्र चालू केले असून सुमारे ५० हून अधिक टू व्हीलर (दुचाकी) आणि बेफाम चालवणारे कामगार आहेत. यापैकी बहुतेक कामगार, दुचाकी वाहक, डिलिव्हरी बॉय हे अनधिकृत लोक दिसतात. बाहेरून आलेली हे तरुण, त्यापैकी अनेक लोक घुसखोर वाटत असल्याचा दावा त्यांनी केला.
कंपनीकडून यांची कोणतीही तपासणी केली जात नाही. त्यांच्या कागदपत्रांची चौकशीही केली जात नाही. तसेच कामगार सुरक्षा संबंधीचे भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) पासून अन्य नियमही पाळले जात नाही. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी, रोहिंग्या, अपात्र घुसखोर दिसत असल्याचे सोमय्या यांनी म्हटले.
हे ही वाचा :
बिहार: भाजपा खासदाराकडून १० कोटींची खंडणी; मुलाला जीवे मारण्याची धमकी!
छठ पूजाः खरना पूजेसाठी पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा!
प्रयागराज: बलात्कार आणि धर्मांतर करणाऱ्या मोहम्मद आलमच्या ढाब्यावर बुलडोझर
महिला डॉक्टर बलात्कार, आत्महत्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अटकेत
मुंबईतील ब्लिंकिट कंपनीच्या सगळ्या वितरण केंद्र स्टोर, दुचाकी चालक/ डिलिव्हरी बॉय व त्या वितरण केंद्रात काम करणाऱ्या सगळ्या कामगारांचे कामगार मंत्रालय, कामगार आयुक्तां द्वारा चौकशी झाली पाहिजे, त्यांचे इन्स्पेक्शन झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ब्लिंकिट ओला उबर — Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 26, 2025 नीलम नगर, मुलुंड (पूर्व) माझ्या घराच्या जवळचा ब्लिंकिट स्टोर तर पूर्णपणे बेकायदेशीर आहे, कामगारही बेकायदेशीर आहेत. त्याच्या संबंधात पोलीस व महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालणार आहे. आपणही संबंधित अधिकाऱ्यांना ब्लिंकिटच्या सगळ्या स्टोअर, वितरण केंद्र, त्यांचे कामगार यासंबंधीची चौकशी, इन्स्पेक्शन करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती कामगार मंत्री फंडकर यांच्याकडे त्यांनी केली आहे.
च्या चालक ड्रायव्हर्स रायडर्स डिलिव्हरी बॉईजच्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पहा, मी कामगार मंत्री आकाश फंडकर यांच्याशी बोललो, विनंती केली @BJP4Maharashtra pic.twitter.com/BNrYxb8GG7







