27.9 C
Mumbai
Monday, August 17, 2026
घरक्राईमनामामुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद

मुलुंडमध्ये कॉलेज तरुणींना लक्ष्य करणारा नराधम जेरबंद

Google News Follow

Related

कॉलेजला जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून, तिला झुडुपात ओढत नेऊन लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला मुलूंड पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरात सुटकेचा निश्वास सोडला जात आहे. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक तरुणी शिक्षणासाठी जात होती. यावेळी मुलूंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका रस्त्यावर अज्ञात इसमाने तिचा पाठलाग केला. आरोपीने तिला रस्त्यालगतच्या झुडपात ओढून नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणी जखमी झाली. पीडितेच्या तक्रारीवरून मुलूंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ७४, ७६, ७९, ११५(२), ३५१(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी केली कारवाई

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलूंड पोलिसांनी ६ तपास पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील २५० सीसीटीव्ही फुटेजचे तब्बल १२० तास बारकाईने विश्लेषण केले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.

हे ही वाचा:

किरण रिजिजूंनी सांगितली ‘दिमागी नक्षलीं’ची लक्षणे

गॉल कसोटीत पडिक्कलचे शतक, भारताची मजबूत पकड

कियाच्या दोन नव्या एसयूव्हीची एंट्री

संविधानाची प्रत घेऊन फिरणाऱ्यांची त्यावर श्रद्धा मात्र नाही

तपासादरम्यान, १४ ऑगस्ट रोजी एका संशयित व्यक्तीला घटनास्थळाच्या परिसरात हालचाली करताना पोलिसांनी पाहिले. तो मोटारसायकलवरून पळून गेल्यानंतर, त्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत पोलिसांनी त्याचा माग काढला. अखेर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अनिल रामचंद्र करोशिया (वय ३१, रा. वाल्मीक नवयुवक सुधारक समिती, सी.पी. तलाव, वागळे इस्टेट, ठाणे) याला अटक करण्यात आली.

महिलांना पोलिसांचे आवाहन

तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी यापूर्वीही अनेकदा घटनास्थळाच्या परिसरात येत असे. त्यामुळे या व्यक्तीकडून यापूर्वी कोणाची छेडछाड झाली असल्यास किंवा असा काही गैरप्रकार घडला असल्यास, संबंधित महिला किंवा तरुणींनी न घाबरता मुलूंड पोलीस किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त ब्रहन्मुंबई आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलूंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आणि त्यांच्या टीमने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मायादेवी काळकोस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा