30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरक्राईमनामाठाणे पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअपवर टाकले अश्लिल व्हीडिओ

ठाणे पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअपवर टाकले अश्लिल व्हीडिओ

Google News Follow

सायबर गुन्हेगारांची मजल आता थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली असून, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खातेच हॅक करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. हॅकर्सनी आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर तब्बल २० अश्लील चित्रफिती अपलोड केल्याने संपूर्ण पोलिस दलात एकच खळबळ उडाली. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या चित्रफिती हटविण्यात आल्या असून, या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या व्हॉट्सॲप खात्याचा अनधिकृत ताबा घेत हॅकर्सनी त्यांच्या स्टेटसवर एकामागोमाग एक सुमारे २० अश्लील चित्रफिती अपलोड करण्यास सुरुवात केली. आयुक्तांच्याच स्टेटसवर अशा प्रकारचे व्हिडीओ दिसू लागल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. हा प्रकार निदर्शनास येताच गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर कक्षाच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास सुरू करत खाते पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व आक्षेपार्ह चित्रफिती स्टेटसवरून हटविण्यात यश आले.

हे ही वाचा:

सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?

भारताच्या आर्थिक विकासाचा वेग मंदावण्याची शक्यता

भारतीय स्टील निर्यातीला युरोपियन युनियनच्या अँटिडम्पिंग शुल्काचा फटका

बोरिवलीत १५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. व्हॉट्सॲप खाते नेमके कसे हॅक झाले आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा कसून तपास सायबर पोलिसांकडून सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क विभागाचे अधिकारी शैलेश साळवी यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. व्हॉट्सॲप स्टेटसवर आलेल्या या आक्षेपार्ह चित्रफितींवर कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच, या चित्रफिती डाउनलोड किंवा फॉरवर्ड करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये आणि या प्रकाराबाबत कोणतीही अफवा पसरवू नये, असेही पोलिसांनी कळवले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा