30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरराजकारणअरविंद सावंत यांना प्रश्न झोंबला; कार्यकर्त्यांकडून पत्रकाराला दमदाटी

अरविंद सावंत यांना प्रश्न झोंबला; कार्यकर्त्यांकडून पत्रकाराला दमदाटी

Google News Follow

उबाठा शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्याकडून एका पत्रकाराच्या प्रश्नांबद्दल नाराजी प्रकट करण्यात आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला दमदाटी केल्याचा प्रकार मंगळवारी घडला.

याबाबतचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यात दिसते आहे की, खासदार अरविंद सावंत हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना पत्रकारांनी त्यांना गाठले आणि प्रश्न विचारले. त्यातील ओम देशमुख या पत्रकाराचा प्रश्न अरविंद सावंतांना बोचला असा दावा करण्यात आला. तेव्हा त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला दमदाटी करायला सुरुवात केल्याचा व्हीडिओ समोर आला आहे. तेव्हा पोलिसांनी तातडीने पत्रकाराला बाजुला नेले. पत्रकारही हे प्रकरण आणखी वाढू नये यासाठी कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते. यासंदर्भात महायुतीतीकडून नाराजी प्रकट करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?

मनातून माफी नको, मनापासून माफी मागा!

पंतप्रधान मोदींच्या विमानाचे सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती!

न्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल आमदाराला समन्स

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एक्सवर सदर व्हीडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, पत्रकारांनी साधा प्रश्न विचारला म्हणून त्यांच्याशी हुज्जत घालणे, दमदाटी करणे आणि समर्थकांकडून त्यांना धमकावले जाण्याचे प्रकार अत्यंत गंभीर आहेत. प्रश्न विचारणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे आणि त्या प्रश्नांना उत्तरे देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. महाराष्ट्राने यापूर्वीही पत्रकारांवरील दबावाचे आणि माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या घटनांचे अनुभव घेतले आहेत. आता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांच्यावरच दबाव आणला जात असेल, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. खासदार अरविंद सावंत यांनी या संपूर्ण प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी आणि आपल्या समर्थकांना समज द्यावी!

अरविंद सावंत यांची यासंदर्भातील प्रतिक्रिया मात्र समोर आलेली नाही.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा