33 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरक्राईमनामान्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल आमदाराला समन्स

न्यायिक अधिकाऱ्यांवरील हल्ल्याप्रकरणी तृणमूल आमदाराला समन्स

एनआयएकडून कारवाई

Google News Follow

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील सुजापूर विधानसभा मतदारसंघाच्या तृणमूल काँग्रेसच्या आमदार सबिना यास्मिन आणि त्यांचे पती मोहम्मद महबूब आलम यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) नव्याने समन्स बजावले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान मोथाबारी येथे न्यायिक अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चौकशीसाठी हे समन्स बजावण्यात आले आहे.

दोघांनाही पुढील आठवड्यात कोलकाता येथील एनआयएच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात एनआयएने यास्मिन यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती.

यास्मिन या पश्चिम बंगाल विधानसभेतील तृणमूल काँग्रेसच्या विद्यमान आमदारांपैकी एक आहेत. त्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गटाशी एकनिष्ठ आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील मागील तृणमूल सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते. दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यात मालदा जिल्ह्यातील कालियाचक-२ ब्लॉकअंतर्गत मोथाबारी येथे ही घटना घडली होती. एसआयआर प्रक्रियेदरम्यान निर्णय देणाऱ्या न्यायिक अधिकाऱ्यांना संतप्त जमावाने ब्लॉक विकास अधिकारी (बीडीओ) कार्यालयात अनेक तास रोखून धरले होते. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १२ रोखून धरला होता. तसेच न्यायिक अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही हल्ला केला होता.

हे ही वाचा:

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

या घटनेवरून त्यावेळच्या राज्य सरकारसह सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र, पक्षातील एका गटाने एसआयआर प्रक्रियेतून मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे संबंधित लोकांनी अचानक संताप व्यक्त केल्याचा दावा केला होता. या प्रकरणाचा तपास नंतर एनआयएकडे सोपवण्यात आला. मोथाबारी घटनेच्या संदर्भात एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. एनआयएने आतापर्यंत दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्यापैकी पहिले ५४ पानांचे, तर दुसरे ११ पानांचे असून, दोन्ही आरोपपत्रांमध्ये एकूण २३ आरोपींची नावे आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा