27 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरक्राईमनामाचिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

प्रकृतीबाबत वकिलांची चिंता

Google News Follow

बांगलादेशातील हिंदू धर्मगुरू आणि सनातनी जागरण जोतचे प्रवक्ते चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांची चटगावच्या मध्यवर्ती कारागृहातून अचानक ढाका येथील केरानिगंज मध्यवर्ती कारागृहात बदली करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना चटगावहून ढाका येथे हलवण्यात आले. या अचानक झालेल्या बदलीमुळे त्यांच्या प्रकृतीबाबत आणि सुरक्षेबाबत त्यांच्या वकिलांनी चिंता व्यक्त केली आहे.

चिन्मय दास यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांच्या आहाराच्या समस्येकडे लक्ष वेधले. चिन्मय दास हे संन्यासी असून, कट्टर शाकाहारी आणि वैष्णव परंपरेचे अनुयायी आहेत. ते स्वतः शिजवलेले अन्नच खात असल्याचे वकिलांनी सांगितले. चटगावच्या तुरुंगात त्यांच्यासोबत असलेले सहआरोपी रंगनाथन ब्रह्मचारी त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यास मदत करत होते. त्यामुळे तुरुंगातही त्यांच्या आहाराची व्यवस्था होत होती.

मात्र, ढाका येथील तुरुंगात ही सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना सध्या केवळ फळांवर राहावे लागत असल्याचा दावा भट्टाचार्य यांनी केला. चिन्मय दास यांना यकृताचा गंभीर आजार असून, त्यांना कोणतेही अन्न खाता येत नाही. त्यामुळे योग्य आहार न मिळाल्यास त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही वकिलांनी व्यक्त केली.

दरम्यान, तुरुंग प्रशासनाने त्यांच्या बदलीला नियमित प्रशासकीय प्रक्रिया असल्याचे म्हटले आहे. कैद्यांची एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात बदली करणे ही सामान्य प्रक्रिया असल्याचे चटगाव मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक इक्बाल हुसेन यांनी सांगितले. मात्र, बदलीचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

भारत आणखी एक हजार विमाने खरेदी करणार

मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष

दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली

चीनचा हवाई वाहतुकीत नवा अध्याय! इलेक्ट्रिक विमान झेपावले

चिन्मय कृष्ण दास यांना २५ नोव्हेंबर २०२४ रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली ढाका येथून अटक करण्यात आली होती. बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चटगाव न्यायालय परिसरात त्यांच्या जामीन सुनावणीदरम्यान हिंसाचार झाला होता. या घटनेत वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची हत्या झाली. या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्यात चिन्मय दास यांच्यासह ३९ जणांवर आरोप निश्चित करण्यात आले असून, खटल्याची सुनावणी सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा