30 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरराजकारणफडणवीसांचे नाव घेत रोहित पवारांनी मफलरवरून गाठला स्वर्ग

फडणवीसांचे नाव घेत रोहित पवारांनी मफलरवरून गाठला स्वर्ग

Google News Follow

अजितदादांच्या अपघातामागे घातपात होता, असा आरोप गेले काही महिने करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आता या प्रकरणात थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ओढले आहे. जे विमान अपघातग्रस्त झाले त्या व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबत फडणवीसांचा फोटो आहे, याचा अर्थ ते हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा शोध रोहित पवार यांनी लावला आहे.

रोहित पवारांनी सोमवारी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन करून या सगळ्या घटनेमागे एक मफलरवाला व्यक्ती असल्याचे सांगितले. त्यांचे नाव देवेंद्र फडणवीस आहे, असे त्यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी आरोप केला की,  व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक नेता करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी या आधी केला होता. त्यांचे नाव आता रोहित पवारांनी जाहीर केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच व्हीएसआर कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे कंपनीचे मालक व्ही के सिंहच्या जयपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत फडणवीसांचा मफलर घातलेला फोटो रोहित पवारांनी दाखवत हाच पुरावा असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

भारतीय शेअर बाजार तेजीच्या हिरव्या निशाणावर बंद

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम- सचिन तेंडुलकर खेळले ‘गल्ली क्रिकेट’

घरबसल्या नोकरीच्या आमिषाने तरुणीला ९०.८ लाखांचा गंडा

आसियान, पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी मनिलात दाखल

रोहित पवारांनी असा दमही दिला की, या सरकारने व्ही के सिंह आणि त्याच्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आमचे सरकार आले तर त्याला सोडणार नाही. अजित दादांचा हा पुतण्या कुणालाही सोडणार नाही.

यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रोहित पवारांची ही स्टंटबाजी असून प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जातील असे भाजपातील अनेक नेत्यांचे म्हणणे होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, फडणवीसांवर जर हे आरोप केले जात असतील तर ते दुर्दैवी आहे. आपण नीचतेचा किती कळस गाठतो आहोत, याचे हे उदाहरण म्हणता येईल. कोणतेही पुरावे नसताना केवळ राजकारण करण्यासाठी जर असे आरोप केले जात असतील तर ते राजकारण एकदिवस त्या आरोप करणाऱ्यांच्याच अंगलट येईल.

व्ही. के. सिंह आणि व्हीएसआर कंपनीला वाचवणारे देवेंद्र फडणवीस हेच नेते आहेत असं आमचं ठाम मत आहे, असे रोहित पवारांनी या आरोपात  म्हटले आहे. आम्ही जर आमच्या काकाला न्याय देऊ शकलो नाही तर गरीबांना न्याय काय देणार? असा प्रश्न आपल्याला पडल्याचे रोहित पवार म्हणाले. मी ज्या व्यक्तीचं नाव घेत आहे त्या व्यक्तीने अजितदादांचा घातपात केला असं मी म्हणत नाही. परंतु, अजितदादांचा अपघात झाला त्या कंपनीच्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जात असल्याचा आम्हाला संशय आहे, असं रोहित पवार म्हणाले.

अजितदादांच्या बंगल्याबाहेर काळी जादू करण्यात आली होती, त्यामध्ये कोकणातील एका नेत्याचा सहभाग असू शकतो, असं रोहित पवार म्हणाले. अपघात की घातपात? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न एक कुटुंबीय म्हणून आम्ही करतोय, असं सांगून रोहित पवार म्हणाले, आमच्याकडे पोलीस व्यवस्था, सीबीआय नाही, पण आमच्याकडे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.

तीन गोष्टी जास्त काळ लपून राहू शकत नाहीत. सूर्य चंद्र आणि सत्य हे गौतम बुद्धांच वाक्य आहे. सत्य हे जपलं पाहिजे त्या अनुषंगाने मी राजकारण करत असतो. अनेकजण चेष्टा करतात की सत्तेच राजकारण मला करायला येत नाही. सत्य काय आहे हे शोधण महत्वाचं आहे. या अनुषंगाने मी प्रयत्न करत आहे, असं रोहित पवार म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा