भारतातकोणाची सत्ता राहावी आणि कोणाची राहू नये, याचा निर्णय यापुढे इटली आणि नॉर्वेमधील धंदेवाईक चळवळीतील लोकांनी करावा, अशा प्रयत्नात काँग्रेस पक्ष आहे. याचे कारण स्पष्ट आहे; मुस्लिम मतदार सोडला तर काँग्रेस पक्षाकडे देशात फारसे समर्थन उरलेले नाही आणि जनताही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे आता विदेशी हातांवरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या;भारत समिट&;मध्ये हा सगळा गोतावळा गोळा करण्यात आला होता. जियाकोमा फिलिबेक या इटालियन राजकीय नेत्याला याच उद्देशाने;भारत समिट २०२६; मध्ये बोलावण्यात आले होते. हा इटालियन नेता मोदींच्या विरोधात बरळला, कारण त्याचे मूळ भारतात नसून इटलीच्या राजकारणात आहे. इटलीतील एक गोरा माणूस भारतात येतो आणि हैदराबादच्या भारत समिटमध्ये "वोट चोर, गद्दी छोड" अशी घोषणा देतो. हा नेता राहुल गांधी यांच्या आजोळचा असल्यामुळे काँग्रेसची पाठराखण करण्यासाठी भारतात आला होता का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल; परंतु हे खरे नाही. याचे खरे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी नसून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या आहेत. मेलोनी आणि मोदी यांच्यात अत्यंत विश्वासाचे संबंध असल्यामुळे फिलिबेकने वड्याचे तेल वांग्यावर काढले एवढेच! इटलीच्या डेमोक्रॅटिक पार्टी;चा हा नेता असून युरोपियन स्तरावर काम करणाऱ्या ;पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट या संघटनेची ही शाखा आहे. हे सगळे नेते कट्टर डाव्या-समाजवादी विचारसरणीचे आहेत. उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीबद्दल त्यांच्या मनात पराकोटीचा द्वेष आहे. २०१४ मध्ये जेव्हा इटलीच्या डेमोक्रॅटिक पार्टीने ;पार्टी ऑफ युरोपियन सोशालिस्ट;चे पूर्णवेळ सदस्यत्व स्वीकारले, तेव्हापासून जियाकोमा फिलिबेक हे इटालियन राजकारणी डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करत आहेत आणि सध्या ते याच संघटनेचे सरचिटणीस आहेत.



