27 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरक्राईमनामापहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

अधिकारी असल्याचे भासवून २२ दिवस ठेवले ऑनलाइन नजरकैदेत

Google News Follow

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू असल्याचे सांगत सायबर भामट्यांनी अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या निवृत्त वकिलाला ‘डिजिटल अटक’ करून तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीआय, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी त्यांना दहशतवाद आणि मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर तब्बल २२ दिवस ऑनलाइन नजरकैदेत ठेवून त्यांची आयुष्यभराची कमाई लुटली.

अतुल तलवार असे फसवणूक झालेल्या निवृत्त वकिलाचे नाव आहे. ते १९८२ मध्ये दिल्ली सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तेथे त्यांनी सुमारे ३० वर्षे कामगार संघटनांसाठी वकिली केली. ३१ जुलै रोजी भारतात परतल्यानंतर ते गुरुग्राममध्ये भावासोबत राहत होते. नोएडातील सेक्टर ३० येथील जुन्या घराच्या नूतनीकरणाचे कामही ते पाहत होते.

१७ ऑक्टोबरला त्यांना फोन आला. फोन करणाऱ्याने आपण मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगितले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे तलवार यांचे आधार कार्ड सापडल्याचा दावा करण्यात आला. तसेच त्यांच्या नावावरील कॅनरा बँक खात्यातून ५३ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे आणि त्यासाठी पाच कोटी रुपये कमिशन मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर अटकेची धमकी देण्यात आली.

आरोपींनी व्हॉट्सअपवर बनावट गोपनीय कागदपत्रे पाठवून सीबीआय आणि एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवले. फोन बंद न करणे, घराबाहेर न पडणे आणि कोणालाही न भेटण्याची सक्ती केली. १८ ऑक्टोबरला घराजवळ दोन सशस्त्र दहशतवाद्यांना अटक केल्याचा बनावट व्हिडिओही दाखवला.

हे ही वाचा:

चिन्मय कृष्ण दास यांचे अचानक ढाका तुरुंगात स्थलांतर

भारत आणखी एक हजार विमाने खरेदी करणार

मोदींचा फिलिपाइन्सचा पारंपरिक पोशाख; ‘बारॉन्ग टागालॉग’ने वेधले लक्ष

दहशतवादविरोधी कारवायांसाठी ‘फोर्स वन’ एटीएसच्या नियंत्रणाखाली

१९ ऑक्टोबरपासून ऑनलाइन चौकशीच्या नावाखाली त्यांच्या बँक खात्यांची आणि गुंतवणुकीची माहिती घेण्यात आली. सिटीबँकेच्या निवृत्तीवेतन खात्यातून ३.८० लाख डॉलर काढण्यास भाग पाडले. त्यानंतर १.५ कोटी रुपये आणि सुमारे २.५ कोटी रुपयांचे इथेरियम क्रिप्टोकरन्सीद्वारे हस्तांतरित केले. ७ नोव्हेंबरपर्यंत ही फसवणूक सुरू होती. पैसे परत न मिळाल्याने तलवार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी नोएडातील सायबर गुन्हे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ११ नोव्हेंबरला न्यूयॉर्कला परतल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या एफबीआयकडेही तक्रार केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा