30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरविशेषपंतप्रधान मोदींच्या विमानाचे सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती!

पंतप्रधान मोदींच्या विमानाचे सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती!

फिलिपाइन्स दौऱ्यादरम्यान नवा इतिहास घडला

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील फिलीपिन्स दौऱ्यादरम्यान एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक घटना घडली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमान एका महिला वैमानिकाने यशस्वीपणे चालवले. यापूर्वी पंतप्रधानांची विमाने नेहमी पुरुष वैमानिकांमार्फत चालवली जात असत, मात्र भारतीय हवाई दलाच्या राष्ट्रपतींच्या ताफ्यातील एका महिला वैमानिकाने हा मान मिळवत नवा इतिहास रचला आहे.

भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात अशा प्रकारे महिला वैमानिकाने देशाच्या पंतप्रधानांचे विमान चालवण्याची ही केवळ दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९५० च्या दशकात एअर इंडियाच्या कॅप्टन उषा सुंदरम यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विमान चालवले होते. विशेष म्हणजे, त्याकाळी कॅप्टन सुंदरम या व्यावसायिक विमान कंपनीत कार्यरत होत्या, तर पंतप्रधान मोदींचे विमान चालवणारी महिला वैमानिका थेट भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील आहे.

मनिला एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) आणि कॉकपिटमधील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपवरून या महिला वैमानिकाच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. पंतप्रधानांच्या या विशेष विमानाचे कॉल साइन ‘इंडिया १’ आणि फ्लाइट क्रमांक ‘के७०६७’ असा होता. या निमित्ताने भारतीय हवाई दलातील महिलांच्या वाढत्या सहभागाचा गौरव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

हे ही वाचा:

बोरिवलीत १५ वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

२०१६ मध्ये फायटर स्ट्रीम सुरू झाल्यापासून, २० हून अधिक महिला लढाऊ वैमानिक भारतीय हवाई दलात सामील झाल्या आहेत, ज्या राफेल, सुखोई-३० एमकेआय, मिग-२१ बायसन आणि जॅग्वार यांसारखी लढाऊ विमाने चालवतात.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा