वर्ल्डकप बॉक्सिंगमध्ये भारताने जिंकली ९ सुवर्णपदके

किरेन रिजिजू यांनी खेळाडूंचे केले कौतुक

वर्ल्डकप बॉक्सिंगमध्ये भारताने जिंकली ९ सुवर्णपदके

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने ९ सुवर्णांसह एकूण २० पदके जिंकत जागतिक पातळीवर आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या शानदार कामगिरीसाठी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले.

किरेन रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “भारतीय बॉक्सिंगसाठी मोठी कामगिरी! जागतिक बॉक्सिंग स्पर्धा २०२५ मध्ये आमच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्य अशी २० पदके जिंकून विक्रम रचला आहे. ही उत्कृष्ट कामगिरी आपल्या क्रीडा क्षेत्रातील धैर्य, शिस्त आणि विजयाच्या वृत्तीचे प्रतीक आहे. जागतिक मंचावर भारताला कीर्ती मिळवून देणाऱ्या प्रत्येक बॉक्सरचा अभिमान आहे. खूप छान!”

ग्रेटर नोएड्यातील शहीद विजय सिंह पाठक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सात महिला बॉक्सरांनी सुवर्णपदक जिंकले.

हे ही वाचा:

भारताची अन्नधान्य उत्पादनात गरुडझेप

जगातील प्रत्येक पाच आयफोनपैकी एक आयफोन तयार होतो भारतात

गरीबी निर्मूलनात भारताचे यश उल्लेखनीय!

मार्गशीर्ष अमावस्येला संगमात स्नान करण्याचे इतके महत्त्व का?

स्वदेशी प्रेक्षकांसमोर जैस्मिन लॅम्बोरिया हिने ऑलिम्पिक पदक विजेत्या वू शिह यी हिला ४-१ ने पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केले. निखत जरीन हिने चीनी तैपेईच्या गुओ यी ज़ुआन हिला ५-० ने मात दिली. परवीन हिने जपानच्या अयाका तागुचीवर ३-२ अशी अटीतटीची लढत जिंकली. त्याशिवाय परवीन, मीनाक्षी, प्रीती, अरुंधती आणि नूपूर यांनी सुवर्णपदके मिळवली.

पुरुष गटात सचिन आणि हितेश यांनी भारतासाठी सुवर्ण मिळवले. सचिन (६० किग्रॅ) ने किर्गिस्तानच्या मुनारबेक उलु सेइतबेकवर ५-० असा शानदार विजय मिळवला. हितेश (७० किग्रॅ) ने सुरुवातीला पिछाडीवर असताना कझाकिस्तानच्या नूरबेक मुर्सलला ३-२ ने हरवले.

भारताने जदुमणी सिंह (५० किग्रॅ), पवन बर्तवाल (५५ किग्रॅ), अभिनाश जामवाल (६५किग्रॅ) आणि अंकुश फंगल (८० किग्रॅ) यांच्या मदतीने सहा रौप्य पदके जिंकली.

पदकविजेत्या भारतीय महिला

पदकविजेते भारतीय पुरुष

Exit mobile version