“खेलो इंडिया यूथ गेम्स” ला बिहारमध्ये दमदार सुरुवात

“खेलो इंडिया यूथ गेम्स” ला बिहारमध्ये दमदार सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहारमध्ये सुरू झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’ मध्ये सहभागी होत असलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि एक महत्त्वाचा संदेश दिला – “खेळा, जगा, आणि बिहारच्या चविष्ट लिट्टी-चोखा नक्की चाखा!”

वीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित करताना मोदी म्हणाले, “खेलो इंडिया यूथ गेम्स हे एक असे व्यासपीठ आहे जे तुमच्या प्रतिभेला नवा आयाम देईल. ही केवळ स्पर्धा नाही, ही तर भारताच्या नवीन उर्जेचे प्रतीक आहे.”

ते पुढे म्हणाले, “भारत आता फक्त खेळत नाही, तर खेळजीवन जगतो आहे. आणि हीच वाढती ‘खेळसंस्कृती’ आपल्या देशाच्या सॉफ्ट पॉवरला अधिक बळकट करेल.”

या वेळी पंतप्रधानांनी बिहारचा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याच्या IPL मधील ऐतिहासिक कामगिरीचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले,
“इतक्या लहान वयात वैभवने जे साध्य केलं आहे, ते केवळ त्याच्या मेहनतीचं नाही तर सतत खेळत राहण्याच्या सवयीचं फळ आहे. ‘जो जितना खेलेगा, वो उतना ही खिलेगा!’”

पंतप्रधानांनी यंदाच्या ₹४,००० कोटीच्या क्रीडा बजेट मधील मोठा वाटा देशभरातील खेळांचे पायाभूत ढांचे मजबूत करण्यासाठी वापरण्यात येईल, असे सांगून भारताच्या स्पोर्ट्स फ्युचरबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला.

खेळांव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी बिहारच्या खाद्यसंस्कृतीचाही गौरव केला.
“जे खेळाडू बाहेरून बिहारमध्ये आले आहेत, त्यांनी नक्कीच लिट्टी-चोखा आणि मखान्याचा आस्वाद घ्यावा!” असे ते हसत म्हणाले.

Exit mobile version