ट्रॉफीचोर पाकड्या मोहसीनचे हसीन सपने!

ट्रॉफीचोर पाकड्या मोहसीनचे हसीन सपने!

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी पाकिस्तान सुपर लीग भविष्यात इंडियन प्रीमियर लीगला मागे टाकेल, असा दावा केला असला तरी सध्याच्या वास्तवात दोन्ही लीगमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते.

नकवी यांनी पीसीबी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या बैठकीत पीएसएल च्या वाढत्या लोकप्रियतेचा उल्लेख करत, गुंतवणूकदारांचा वाढता रस ही लीगच्या प्रगतीची निशाणी असल्याचे सांगितले. त्यांनी पीएसएल लवकरच जगातील सर्वात मोठी टी२० लीग बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

मात्र, या दाव्याच्या पार्श्वभूमीवर वास्तव वेगळे चित्र दाखवते. सध्या पीएसएलचा ११वा हंगाम अफगाणिस्तानसोबतच्या तणावामुळे केवळ दोन ठिकाणी खेळवला जात आहे, तर आयपीएल ठरलेल्या वेळापत्रकानुसार कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडत आहे.

खेळाडूंच्या बाबतीतही आयपीएलचे वर्चस्व स्पष्ट आहे. अनेक खेळाडू पीएसएलचा करार सोडून आयपीएलमध्ये सहभागी होतात. यामागे आयपीएलमधील अधिक मानधन आणि मोठी व्यावसायिक संधी हे मुख्य कारण आहे. यंदाही दासुन शनाका आणि ब्लेसिंग मुजरबानी यांनी पीएसएल सोडून आयपीएलला प्राधान्य दिले.

आर्थिक बाबतीत दोन्ही लीगमधील फरक अधिक ठळक आहे. आयपीएलचे मीडिया राइट्स सुमारे ६ अब्ज डॉलर इतके आहेत, तर पीएसएलचे मूल्य केवळ ९३ दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. आयपीएलचे वार्षिक उत्पन्न १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त असून पीएसएलचे उत्पन्न सुमारे ६० दशलक्ष डॉलर आहे.

वर्ल्ड क्रिकेटर्स असोसिएशनच्या अलीकडील क्रमवारीत आयपीएल ६२.२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर पीएसएल ४८ गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ‘द हंड्रेड’ आणि ‘SA20’ या लीग अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

या सर्व बाबी लक्षात घेतल्यास, आयपीएलला मागे टाकण्याचा दावा हा सध्याच्या परिस्थितीत वास्तवापेक्षा दूर असल्याचेच स्पष्ट होते.

Exit mobile version