पॅरा अथलेटिक्समध्ये प्रणव देसाईला २ सुवर्ण

ठाणे मनपा अथलेटिकस योजनेचा खेळाडू

पॅरा अथलेटिक्समध्ये प्रणव देसाईला २ सुवर्ण

११ ते १३ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे दुसरी जागतिक पॅरा एथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रणव देसाईने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.

प्रणव म्हणाला, “ही या हंगामाची पहिली स्पर्धा आहे. मला फक्त चांगली सुरुवात करायची होती. मी कामगिरीवर खूश आहे.” “मागील आवृत्तीपेक्षा प्रणवने त्याची कामगिरी सुधारली आहे. तो कठोर परिश्रम करत आहे. मला आशा आहे की त्याचे वर्ष चांगले जाईल, असे प्रशिक्षक निलेश पाटकर म्हणाले.

हे ही वाचा:

नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा फेटाळली

उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून १ लाखांची फसवणूक

देशातील पहिल्या ग्रीन स्टील प्लांटचा मार्ग मोकळा

मीनल पलांडे आणि अशोक आहेर (टीएमसीपीवाय – योजना प्रमुख) यांनी प्रणव, त्याच्या पालकांचे अभिनंदन केले आहे आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.”

Exit mobile version