प्रणव देसाईने जिंकली दोन सुवर्णपदके

इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतील कामगिरी

प्रणव देसाईने जिंकली दोन सुवर्णपदके

प्रणव देसाईने २६ ते २८ मे २०२६ दरम्यान बंगळूर येथे झालेल्या ८ व्या इंडियन ओपन इंटरनॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२६ मध्ये १००Pranav desai, gold medals, para athletics, thane, patkar मीटर आणि २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदके पटकावली आहेत. प्रणवने टी६४ (T64) प्रकारात १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रशिक्षक निलेश पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणव सराव करत आहे.

प्रणव म्हणाला, “मी माझ्या कामगिरीवर खूप आनंदी आहे. बऱ्याच कालावधीनंतर मला राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करता आला. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे.”

हे ही वाचा:

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

देशांतर्गत विमान कंपन्यांना १०,००० कोटींची मदत

दिल्लीतील मालवीय नगरमधील रेस्टॉरंटला आग; २२ जणांचा मृत्यू

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

“प्रणव गेल्या एक-दोन वर्षांपासून आपल्या कामगिरीत सातत्य राखत आहे. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स आणि नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकून त्याने या वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. आम्हाला आशा आहे की, तो या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एशियन पॅरा गेम्स ‘२६ साठी पात्र ठरेल.” या प्रसंगी, श्रीमती मिनल पलांदे (अतिरिक्त उपायुक्त – टीएमसी) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख – टीएमसीएपीवाय) यांनी प्रणव आणि त्याच्या पालकांचे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्याला आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. निलेश पाटकर, प्रशिक्षक.

Exit mobile version