भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२६-२७ हंगामासाठी भारतीय पुरुष वरिष्ठ संघाच्या आंतरराष्ट्रीय घरगुती मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या हंगामात श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या संघांचा भारत दौरा होणार असून एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने देशातील १७ शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत.
सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान वेस्ट इंडिजचा भारत दौरा होणार असून तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळले जातील. त्यानंतर डिसेंबरमध्ये श्रीलंका संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळेल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वे संघ तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतात येणार आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर करंडकाची कसोटी मालिका रंगणार आहे.
वेस्ट इंडिजचा भारत दौरा (२०२६)
एकदिवसीय मालिका :
- २७ सप्टेंबर : पहिला सामना (तिरुवनंतपुरम)
- ३० सप्टेंबर : दुसरा सामना (गुवाहाटी)
- ३ ऑक्टोबर : तिसरा सामना (न्यू चंदीगड)
टी-२० मालिका :
- ६ ऑक्टोबर : पहिला सामना (लखनौ)
- ९ ऑक्टोबर : दुसरा सामना (रांची)
- ११ ऑक्टोबर : तिसरा सामना (इंदूर)
- १४ ऑक्टोबर : चौथा सामना (हैदराबाद)
- १७ ऑक्टोबर : पाचवा सामना (बंगळुरू)
श्रीलंकेचा भारत दौरा (२०२६)
एकदिवसीय मालिका :
- १३ डिसेंबर : पहिला सामना (दिल्ली)
- १६ डिसेंबर : दुसरा सामना (बंगळुरू)
- १९ डिसेंबर : तिसरा सामना (अहमदाबाद)
टी-२० मालिका :
- २२ डिसेंबर : पहिला सामना (राजकोट)
- २४ डिसेंबर : दुसरा सामना (कटक)
- २७ डिसेंबर : तिसरा सामना (पुणे)
झिम्बाब्वेचा भारत दौरा (२०२७)
एकदिवसीय मालिका :
- ३ जानेवारी : पहिला सामना (कोलकाता)
- ६ जानेवारी : दुसरा सामना (हैदराबाद)
- ९ जानेवारी : तिसरा सामना (मुंबई)
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा – बॉर्डर-गावस्कर करंडक (२०२७)
- २१-२५ जानेवारी : पहिली कसोटी (नागपूर)
- २९ जानेवारी – २ फेब्रुवारी : दुसरी कसोटी (चेन्नई)
- ११-१५ फेब्रुवारी : तिसरी कसोटी (गुवाहाटी)
- १९-२३ फेब्रुवारी : चौथी कसोटी (रांची)
- २७ फेब्रुवारी – ३ मार्च : पाचवी कसोटी (अहमदाबाद)
हा संपूर्ण हंगाम क्रिकेट चाहत्यांसाठी उत्साहाचा पर्व ठरणार आहे.
