व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २८ ऑक्टोबरपासून रंगणार

१२ वर्षांखालील मुलांसाठीची स्पर्धा

व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २८ ऑक्टोबरपासून रंगणार

पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने नव्या हंगामाची सुरुवात करताना युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून १२ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ऑक्टोबर ते ०६नोव्हेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या संघासह
किरण क्रिकेट अकॅडमी, श्री श्री रविशंकर अकॅडमी, ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी, यंगस्टर्स क्रिकेट अकॅडमी, क्रिकबेसिक्स अकॅडमी, जिनियस क्रिकेट अकॅडमी, आर्यन्स क्रिकेट अकॅडमी, क्रिकफिटनेट अकॅडमी, स्पेशल इलेव्हन अकॅडमी, चंद्रोस क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी, ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी, मॅव्हरीक्स क्रिकेट अकॅडमी, अथलिट्स क्रिकेट अकॅडमी, डी व्ही चॅलेंझर्स अशा नामांकित सोळा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

हर्ष राऊतने जिंकले रौप्य आणि ब्राँझपदक

“केवळ ‘प्रधानसेवक’ नाही, तर खरा नेता म्हणून देशाचे मार्गदर्शन करतात”

मुंबईत एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीचा पर्दाफाश

ब्लिंक इट, ओला आणि उबेरमध्ये बांगलादेशी घुसखोर!

सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे अव्वल चार संघात दोन उपांत्य सामने होतील. अंतिम सामना ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. थेरगाव येथील मैदानावर २८ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या थेरगाव येथील मैदानावर होतील. प्रत्येक सामना २० षटकांचा असेल.

प्रत्येक सामन्यातील योद्धा खेळाडूला पदक आणि सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल. पारितोषिक वितरण ०६ नोव्हेंबर रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांचे हस्ते होईल.

Exit mobile version