कॉक्रोच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोनम वांगचूक जंतरमंतरवर उपोषण करत होते. हॉस्पिटलमध्ये हलवल्यानंतरही त्यांनी उपोषण जारी ठेवले. ते माघार घेण्याची चिन्हे नसताना, अचानक सरकारने विनंती करावी आणि विनंतीची वाट पाहात असल्यासारखे त्यांनी उपोषण मागे घ्यावे, ही बाब अनेकांना खटकली होती. बऱ्याच कॉक्रोचनी माघारीवरून त्यांना ट्रोल केले. कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर काल सोमवारी वांगचूक राजघाटावर गेले होते. तिथे ते जे काही म्हणाले, त्यातून अभिजीत दिपके आणि त्यांच्यातील शीतयुद्ध समोर आले आहे. आंदोलनात हिंसचार घडणार आहे, याचे पुरावे सरकारने वांगचूक यांना दाखवले होते, त्यातून त्यांनी उपोषणातून माघार घेतली असावी. आंदोलनात २८७३ दाखलेबाज शिरले होते, ही माहिती उघड झाल्यानंतर या तर्कावर आता शिक्कामोर्तब होत चालले आहे. मोदी-शहा यांनी लावलेल्या सापळ्यात ‘सी’ कंपनी चालत आलेली आहे. गेल्या चार दिवसांत दिल्लीत महत्वपूर्ण घडामोडींची जंत्री सुरू आहे. २४ जुलै रोजी पहाटे १.२१ वाजता सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली. २६ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात २८७३ दाखलेबाज गुन्हेगारांचा वावर होता, अशी माहिती उघड केली. याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीचा प्रमुख चेहरा अभिजीत दिपके याने दहशतवाद्यांचे वकीलपत्र घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले जेष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांची भेट घेतली. २७ जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी कपिल सिब्बल यांच्या सोबत एक पत्रकार परीषद घेतली. सिब्बल यांनी सीजेपीला एक कोटीची देणगी आणि सर्वप्रकारची कायदेशीर मदत देण्याचे जाहीर केले. सिब्बल यांच्यासारखा महागडा वकील करण्यासाठी सीजेपीकडे पैसा कुठून आला, असा प्रश्न उद्या कोणी विचारू नये, याची तरतुद बहुधा सिब्बल यांनी करून ठेवली. त्याच दिवशी वांगचूक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना अभिवादन केले.
