आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडथळा तिने धैर्याने आणि संयामाने पार केला. २०१३ साली नववर्षाच्या पहिल्या दिवशी तिच्या वडिलांची हत्या झाल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले, तेव्हा ती केवळ नऊ वर्षांची होती. या दुर्दैवी घटनेमुळे तिचे कुटुंब कठीण परिस्थितीत अडकले. हा दुःखाचा डोंगर समोर असताना तिचे मनोबल खचू शकले असते, मात्र रंजना कुमारीने आपले दुःख बाजूला सारून स्वतःसाठी एक उद्देश आणि लक्ष्य बनवले.
तेरा वर्षांनंतर, झारखंडमधील ही २२ वर्षीय युवती आज बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल असून, राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तान सीमेवर आपल्या पहिल्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. “हा गणवेश माझ्या आईच्या संघर्ष आणि त्यागाचा परिणाम आहे,” असे तीन बहिणींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रंजनाने सांगितले. हजारीबागच्या तातीझा रिया ब्लॉकमधील अमनारी गावात वाढलेल्या रंजनाचे विद्यार्थी जीवन हे प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्याचे शिक्षण घेण्यावर केंद्रित होते.
वडील मनोज कुमार कुशवाहा यांच्या निधनानंतर, रंजनाची आई नूतन देवी यांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केले जेणेकरून आपल्या मुलींना शाळा सोडावी लागू नये. यासोबतच रंजनाने हजारीबागमध्ये आपले शिक्षण सुरू ठेवत गावातील ४० मुलांना शिकवणी देऊन आईला आर्थिक हातभार लावला. त्यानंतर तिने विष्णुगढ डिग्री कॉलेजमधून इतिहास विषयाचे शिक्षण घेतले. २०२४ मध्ये रंजनाने रांची येथे झालेली एसएससीमार्फत घेण्यात आलेली बीएसएफ भरती परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि बंगालमधील सिलीगुडी येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी तिची निवड झाली. गेल्या आठवड्यात झालेला तिचा पासिंग- आऊट परेड हा रंजना आणि तिच्या कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला.
हे ही वाचा..
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वाजले बिगुल! ५ फेब्रुवारीला मतदान
दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित
रशियन तेल टँकरमधून अटक केलेल्या तीन भारतीयांची सुटका
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे त्रि-सेवा सहकार्याचे सर्वोत्तम उदाहरण!
“माझी मोठी बहीण संजना हिचा विवाह विशाखापट्टणममध्ये असलेल्या सॉफ्टवेअर अभियंत्याशी झाला आहे, तर माझी धाकटी बहीण अंजली हजारीबागमध्ये पदवीचे शिक्षण घेत आहे,” असे रंजनाने सांगितले. रंजनाच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम करण्यासाठी आम्ही सिलीगुडी येथे आलो होतो, अशा भावना परेडला उपस्थित असलेले रंजनाचे मेहुणे प्रशांत रंजन यांनी व्यक्त केला.
