कोलकाता येथील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू

केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

कोलकाता येथील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू

कोलकातामधील बडा बाजार येथील ऋतुराज हॉटेलमध्ये मंगळवारी (२९ एप्रिल) रात्री लागलेल्या भीषण आगीत महिला आणि मुलांसह १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीचे कारण शोधण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मच्छुआ जवळील ऋतुराज हॉटेलच्या आवारात रात्री ८.१५ च्या सुमारास आग लागली, असे वृत्त एएनआयने दिले आहे. घटनेच्या वेळी ६० कर्मचारी उपस्थित होते, असे पोलिसांनी सांगितले.

कोलकातामधील आगीच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी चंचल गुप्ता यांनी सांगितले. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तास लागला आणि सुमारे अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. पहाटे ४.३० च्या सुमारास मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले.

ऋतुराज हॉटेलच्या आवारात लागलेल्या आगीनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच संपूर्ण हॉटेल धुराने भरले आणि लोक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले, परंतु त्यापैकी बहुतेक जण धुरात गुदमरून मरण पावले. पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “मच्छुआ बाजार येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत महिला आणि मुलांसह १४ जणांचा मृत्यू झाला. ही केवळ एक घटना नाही तर ती हत्या आहे, कारण अशा घटना वारंवार घडत आहेत. कोलकात्यातील परिस्थिती खूप वाईट आहे. अग्निशमन दलाचे मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, परंतु मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. ते फक्त उत्सव साजरा करण्यात व्यस्त आहेत.”

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींचा ‘तो’ निर्णय आणि पाकिस्तानची उडाली झोप; मध्यरात्री मंत्र्याची पत्रकार परिषद

विशाखापट्टणममध्ये भाविकांच्या अंगावर भिंत कोसळून आठ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री महोदय, ही घ्या शांतीदूत पवारांचे ऋण फेडण्याची संधी…

२०२५ मध्ये फ्रेशर्स आणि टेक टॅलेंटसाठी प्रचंड मागणी

दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने बुधवारी (३० एप्रिल) त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की, “कोलकाता येथील आग दुर्घटनेत झालेल्या लोकांच्या मृत्यूमुळे दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करतो. जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. याशिवाय, जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.”

Exit mobile version