अमरावतीमध्ये इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ५ लाख मदत करण्याचे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला

अमरावतीमध्ये इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू, कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

अमरावती येथे ८० वर्ष जुनी बिल्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच ही घटना अमरावती जिल्ह्यातील प्रभात टॉकीज परिसरात घडली आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारत घडली. या बिल्डिंगच्या ढिगाऱ्यांखालून ५ जणाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही ढिगारा उपासण्याचे काम चालू आहे. अशी माहीती अमरावती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरातील या इमारतीचे सायंकाळी काही भागाचे तुकडे पडू लागले. त्यानंतर ७ च्या सुमारास ही दोन मजली बिल्डिंग क्षणार्धात संपूर्ण कोसळली. बिल्डिंग कोसळल्या नंतर स्थानिक रहिवासी व पोलिस प्रशासन व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व युद्धपातळीवर मदतकार्य करण्यास सुरवात झाले. पोलीस व महानगरपालिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच महानगर पालिकेने ही इमारत पाडण्यासाठी या पूर्वीच नोटीस दिली होती. घटनास्थळी आज खासदार नवनीत राणा व आमदार सुलभा खोडके यांनी दाखल होऊन घटनास्थळांची पाहणी केली.

राजदीप बॅग हाऊस असे या कोसळलेल्या इमारतीचे नाव आहे. दुर्घटनेत आणखी काही जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना जितेंद्र सिंग हे स्थानिक रहिवासी व दुकानदार म्हणाले की, कोसळलेली ही इमारत ८० वर्षे जुनी आहे. या इमारतीमधील राहिवाशांना पालिकेतर्फे नोटिस ही देण्यात आली होती. मात्र राहिवाशांचे काही अंतर्गत वाद असल्याने नागरिकांनी इमारत रिकामी केली नव्हती. तसेच या दुर्घटनेमधील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात येणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. अशा आशयाचे ट्वीट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Exit mobile version