गेली अनेक दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाले. बारामती येथे लँडिंगवेळी त्यांचे विमान कोसळले आणि यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानात असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनाने बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. यानंतर अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी भावनिक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते जमले होते. सकाळी शोकाकुल वातावरणात बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपाचे नेतेही यावेळी उपस्थित होते. अमित शाह यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर इतर नेत्यांनी अजित पवारांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी इतर राज्यातील नेतेही उपस्थित होते.
अजित पवार यांच्या अपघातानंतर त्यांचा मृतदेह बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला होता. याठिकाणी सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर बुधवारी संध्याकाळी अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. यावेळी बारामतीची तमाम जनता अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी जमली होती. सामान्य बारामतीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांना आपल्या लाडक्या अजितदादांना निरोप देताना शोक अनावर झाला होता. काही तास अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवल्यानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुन्हा बारामती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला.
गुरुवारी सकाळी काही वेळ अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. यानंतर बारामतीच्या काही भागांमधून अजित पवार यांच्या अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांना भावनिक वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.
हे ही वाचा:
बांगलादेशचा दुटप्पीपणा; क्रिकेटवर बहिष्कार पण नेमबाजी संघाच्या भारत प्रवासाला परवानगी
अमेरिकन सायबर एजन्सीच्या प्रमुखाने चॅटजीपीटीवर शेअर केली संवेदनशील कागदपत्रे
आता फ्रेंच वाईन भारतात स्वस्त मिळणार
अरिजीत सिंहचा पार्श्वगायनाला रामराम, श्रेया घोषाल यांचा पाठिंबा
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी बारामतीत पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तर, अजित पवार यांच्या अंत्यविधीसाठी बारामती येथे अनेक बडे राजकीय नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजपाचे नेतेही यावेळी उपस्थित होते.
