हायपरमार्केटच्या भीषण आगीत ५० जणांचा मृत्यू

हायपरमार्केटच्या भीषण आगीत ५० जणांचा मृत्यू

इराकमधील वासित प्रांतातील एका हायपरमार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे ५० लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वासितचे गव्हर्नर मोहम्मद जमील अल-मायाही यांनी गुरुवारी दिली. मध्य कुत शहरात घडलेल्या या शोकांतिक घटनानंतर गव्हर्नर यांनी तीन दिवसांच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. ही दुर्घटना तेव्हा घडली, जेव्हा लोक खाण्यासाठी आणि खरेदीसाठी मॉलमध्ये आले होते. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या मते, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, कारण अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इराकी राज्य वृत्तसंस्था (INA) ला दिलेल्या प्रतिक्रियेत गव्हर्नर अल-मायाही यांनी दुःख व्यक्त करत सांगितले, “आम्ही आमचे अनेक बंधू-भगिनी गमावले आहेत. ही घटना केवळ कुत शहरासाठी नव्हे तर संपूर्ण वासित प्रांतासाठी मोठी शोकांतिका आहे. त्यांनी या घटनेला जबाबदार ठरणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की मॉलचे मालक, इमारतीचे मालक व इतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली गेली आहे. त्यांनी हेही सांगितले की, ४८ तासांच्या आत प्राथमिक तपासाचा अहवाल सार्वजनिक केला जाईल.

हेही वाचा..

नितीश कुमार यांनी १७ दिवसांत घेतले १० महत्त्वाचे निर्णय!

अंदमान समुद्रात अनेक तेल क्षेत्रे सापडण्याची अपेक्षा

१० वर्षांनंतर रंगणार ‘रिवेंज ड्रामा’ – झिम्बाब्वे करणार न्यूजीलंडचा सामना!

घरात पैशांचा ढीग सापडलेल्या न्या. यशवंत वर्मांविरुद्ध महाभियोग चालेल?

गव्हर्नर म्हणाले, “या घटनेला जे कोण थेट किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहेत, त्यांच्याबाबत कोणतीही सौम्यता दाखवली जाणार नाही. वासित पोलीस कमांडने सांगितले की, कॉर्निश हायपरमार्केटमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागरिक सुरक्षा पथकांना पूर्ण तयारीत ठेवण्यात आले आहे. गव्हर्नर अल-मायाही यांनी बचाव कार्याचे स्वतः निरीक्षण केले, तर आपत्कालीन पथके पाच मजली इमारतीच्या आत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती.

वासित गव्हर्नरेट कार्यालयाच्या माहितीनुसार, सिव्हिल डिफेन्सच्या टीम्सनी इमारतीच्या वरच्या मजल्यांवर पोहोचून अनेकांना सुखरूप बाहेर काढले. सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या काही व्हिडिओंमध्ये इमारतीतून निघणाऱ्या आगाच्या प्रचंड ज्वाळा आणि फायर ब्रिगेडच्या पथकांचे आग विझवण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. अधिकार्‍यांनी या भीषण आगीच्या कारणांची चौकशी सुरू केली आहे.

Exit mobile version